आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE ICC Cricket World Cup, 3rd Match, Pool B: Zimbabwe, Who Chose To Field, News In Marathi

SA vs ZIM : दक्षिण आफ्रिकेचा 62 धावांनी दणदणीत विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅमिल्टन- वर्ल्ड कप-2015 मधील तिस-या सामन्‍यामध्‍ये दक्षिण आफ्रिकेने झिम्‍बॉंम्‍बेला 48.2 षटकात सर्वबाद करत 62 धावांनी दणदणीत विजय मिळविला.
(फोटो -शानदार पारीदरम्‍यान शॉट लगावताना चिभाभा)
तत्‍पूर्वी प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांच्‍या समाप्‍तीनंतर 4 विकेट गमावत 349 धावा केल्‍या आहेत.
तत्‍पूर्वी द. अफ्रीकाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 50 षटकात 4 विकेटच्‍या मोबदल्‍यात 349 धावा केल्‍या होत्‍या. मिलर 138 धावा आणि ड्यूमिनी 115 धावा काढून बाद झाले.
झिम्‍बॉब्‍वेच्‍या विकेट
झिम्‍बॉब्‍वेला सिकंदर रजाच्‍या रुपात पहिला धक्‍का बसला. केवळ पाच धावांवर त्‍याला फिलेंडरने क्‍लीन बोल्ड केले. त्‍यानंतर मस्काद्जा आणि चिभाभाने डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न केला. दोघांनीही अर्धशतके लगावली. चिभाभा 64 आणि मस्काद्जा 80 धावा केल्‍या. या दोघांनाही ताहीरने बाद केले. टेलर 40 धावा करुन बाद झाला. मात्र, त्‍यानंतर आलेले फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरू शकले नाही.
द. आफ्रीकेची फलंदाजी
दक्षिण आफ्रीकेची पहिली विकेट क्विंटन डि कॉकच्‍या रुपात भेटली. केवळ सात धावा काढून तो बाद झाला. त्‍याला चताराने इरविन करवी बाद केले. त्‍यानंतर आलेला हाशिम आमला (11) आणि फॉक डू प्‍लेसि‍स (24) स्‍वस्‍तात बाद झाले. त्‍यानंतर कर्णधार एबी डिव्‍हीलिअर्सही 25 धावात बाद झाला.
मिलर-ड्यूमिनीची शानदार शतके
मिलर आणि ड्यूमिनी या जोडीने दक्षिण आफ्रिकेचा डाव सांभाळत शानदार शतकी खेळ्या साकारल्‍या. दोघेही मैदानावर सेट झाल्‍यानंतर त्‍यांनी झिम्‍बॉब्‍वेच्‍या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. मिलरने 92 चेंडूंचा सामना करताना 9 षटकार आणि सात चौकार लगावत 138 धावा केल्‍या. ड्यूमिनीने 100 चेंडूचा सामना करताना 115 धावा केल्‍या. त्‍यामध्‍ये तीन षटकार आणि 9 चौकारांचा समावेश आहे.
उभय संघ
दक्षिण आफ्रीका : हाशिम आमला, क्विंटन डी काक, फॉक डू प्लेसिस, एबी डिविलियर्स (कर्णधार), जेपी डुमिनी, डेविड मिलर, बेहाडिएन/ पर्नेल, फिलेंडर, स्टेन, एल्बी मोर्कल, ताहिर
झिम्‍बॉब्वे: सिकंदरराज बट, चिभाभा, मस्काद्जा, टेलर, एरविन, सीन विलियम्स, चिगुंबरा (कप्तान), सोलोमन, मुपारिवा/उत्सेया, तिनाशे पेनयंगारा, तेंदई चतारा
पुढील स्‍लाइडवर छायाचित्रांमधून पाहा, सामन्‍यातील रोमांच..