आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE Ind Vs Bangladesh T20 World Cup Match Score In Marathi

T-20 WC : बांगलादेशचा पराभव; भारत उपांत्य फेरीत दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीरपूर - भारतीय संघाने विजयी हॅट्ट्रिकसह आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने शुक्रवारी यजमान बांगलादेशचा 8 गड्यांनी पराभव केला. भारताचा वर्ल्डकपमधील हा सलग तिसरा विजय ठरला. आता भारताचा चौथा सामना 30 मार्च रोजी ऑस्ट्रेलियाशी होईल.

रोहित शर्मा (56) आणि विराट कोहली (नाबाद 57) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर भारताने 18.3 षटकांत सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना यजमान टीमने घरच्या मैदानावर 7 गडी गमावून 138 धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. दोन विकेट घेणारा अश्विन सामनावीरचा मानकरी ठरला.

भारताचा शिखर धवन (1) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या विराट कोहलीने संघाचा डाव सावरला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाबाद 22 धावांचे योगदान दिले.

शर्मा-कोहलीची शतकी भागीदारी
भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दुसर्‍या गड्यासाठी निर्णायक शतकी भागीदारी केली. यात रोहितने शानदार अर्धशतक झळकावले. त्याचे या वर्ल्डकपमधील हे दुसरे अर्धशतक ठरले. यापूर्वी त्याने विंडीजविरुद्ध 62 धावा काढल्या होत्या. तसेच विराट कोहलीने नाबाद 57 धावा काढल्या. त्याने 50 चेंडंूचा सामना करताना तीन चौकार व एका षटकारासह अर्धशतक पूर्ण केले. विराट कोहलीचे हे दुसरे अर्धशतक ठरले.

पुढील स्लाइडवर पाहा, सामन्याचे छायाचित्रे...