आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • LIVE Ind Vs Eng 5th ODI Latest Scores News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जो रुटच्‍या झुंजार शतकामुळे भारतासमोर इंग्‍लंडचे 295 धावांचे आव्‍हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इंग्‍लंडचे जेम्‍स अँडरसन आणि जो रुट सिल्‍वर बॅटच्‍या सन्‍मानासोबत)
लीड्स - हेडिंगले मैदानावर होत असलेल्‍या भारत विरुध्‍द इंग्‍लंड यांच्‍यातील पाचव्‍या एकदिवसीय सामन्‍यामध्‍ये धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
इंग्‍लंडने 295 धावांचे लक्ष्‍य भारतासमोर ठेवले आहे. 50 षटकाअखेर सात गड्यांच्‍या मोबदल्‍यात त्‍यांनी हे आव्‍हान भारताला दिले आहे.
जो रुटचे झुंजार शतक
आधीच 3-1 अशी मालिका गमावलेल्‍या इंग्‍लंडची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर हेल्‍स केवळ चार धावांवर परतला. मोइन अली 9 धावांवर परतला असताना रुटने डावाचे सुत्र आपल्‍या हाती घेतले आणि इंग्‍लंडचा डाव साकारला. त्‍याच्‍या शतकी धावसंख्‍येमुळेच इंग्‍लंडला आश्‍वासक धावसंख्‍या उभारता आली.
STAT ALERT: एलिस्‍टर कूक एकदिवसीय सामन्‍यामध्‍ये सर्वांधीक धावा काढणारा इंग्‍डंलचा पहिला कर्णधार बनला आहे. त्‍याने एंड्यू स्‍ट्रॉसला मागे टाकत 2367 धावा बनविल्‍या आहेत.
उमेश यादवने उघडले खाते
भारतला पहिली विकेट उमेश यादवने मिळवून दिली असून त्‍याने हेल्‍सला अजिंक्‍य रहाणेकरवी झेलबाद केले असून भारतासाठी विकेटचे खाते उघडले आहे.
संघात बदल
भारतीय संघामध्‍ये गोलंदाजीमध्‍ये बदल केला आहे. धवल कुलकर्णी ऐवजी उमेश यादवला संधी देण्‍यात आली आहे. तर यजमान इंग्‍लंडने संघामध्‍ये दोन बदल केले . हॅरी गर्नी आणि गॅरी बॅलेंसच्‍या जागी बेन स्‍टोक्‍स आणि जेम्‍स ट्रेडवॅल यांना अंतीम 11 मध्‍ये संधी देण्‍यात आली आहे.
उभय संघ
इंग्लंड -
कर्णधार महेंद्र सिंह धोनी, एलेक्स हेल्स, मोइन अली, जो रूट, इयॉन मॉर्गन, जोस बटलर, बेन स्टोक्स, क्रिस वोक्स, जेम्स ट्रेडवॅल, स्टीवन फिन आणि जेम्स एंडरसन
भारत -
शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, अंबाती रायुडू, सुरेश रैना, कर्णधार महेंद्र सिंह धोनी, रवींद्र जडेजा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि उमेश यादव
पुढील स्लाइडवर पाहा छायाचित्रे..