आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE Ind Vs Eng Southampton Test Day 2 Latest Score In Marathi

तिसरी कसोटी : भारतीय संघाची निराशाजनक सुरुवात, इंग्लंडची धावांची बरसात!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साउदम्पटन - भारताविरुद्ध तिसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी इंग्लिश फलंदाजांनी धावांची बरसात केली. बॅलेन्सपाठोपाठ इयान बेलच्या शतकामुळे (166) यजमानांनी 7 बाद 569 धावांवर पहिला डाव घोषित केला. दरम्यान, भारताची पहिल्या डावात निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर शिखर धवन (6) झटपट बाद झाला. त्यामुळे भारताला दुसर्‍या दिवसअखेर सोमवारी पहिल्या डावात एक बाद 25 धावा काढता आल्या. सलामीवीर मुरली विजय (11) आणि चेतेश्वर पुजारा (4) खेळत आहेत.
पहिल्या दिवशीचे नाबाद फलंदाज बॅलेन्स आणि बेल यांनी दुसर्‍या दिवशी डाव सुरू केला. बॅलेन्सने दीड शतक (156) झळकावले. इंग्लंडच्या 355 धावसंख्येवर तिसर्‍या गड्याच्या रूपात तो बाद झाला. कामचलाऊ रोहित शर्माने धोनीकरवी त्याला टिपले. त्यानंतर आलेले ज्यो रुट (3) आणि मोईन अली (12) हजेरी टाकून गेले. रूट 378, तर अली संघाच्या 420 धावसंख्येवर बाद झाला. पहिली कसोटी गाजवणार्‍या रूटने या वेळी इंग्लंडला निराश केले. या दोघांनाही भुवनेश्वरने टिकू दिले नाही. इंग्लंडच्या ज्यो रूटचा धोनीने, तर अलीचा रहाणेने झेल घेतला. भारतीय गोलंदाजांनी दुसर्‍या दिवशीही चाहत्यांची घोर निराशा केली. या वेळी भारताच्या एकट्या भुवनेश्वरने दोन गडी बाद केले. तसेच रोहितने एक बळी मिळवला.

धावांचा ‘बेल’ भंडारा!
इयानने लौकिकास साजेशी फलंदाजी करून भारतासाठी धोक्याची बेल दिली. त्याने 256 चेंडूंचा सामना करताना 16 चौकारांसह 167 धावांची खेळी केली. बॅलेन्स बाद होताच डावाची सारी सूत्रे हाती घेऊन त्याने धावा केल्या. मात्र दुसर्‍या टोकाने त्याला साथ मिळाली नाही. बटलरने 85 धावा काढून संघाला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली.