आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE Ind Vs England Southampton Test Match Day 4 Score News In Marathi

चौथा दिवस : भारतावर पराभवाचे सावट; इंग्लंडचे गोलंदाज चमकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साउदम्पटन - इंग्लंडविरुद्ध तिसर्‍या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघावर पराभवाचे सावट निर्माण झाले आहे. इंग्लंडने दिलेल्या 445 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाची बुधवारी चांगलीच दमछाक झाली. मोईन अलीने धारदार गोलंदाजी करून दोन बळी घेतले. त्यामुळे भारताला दुसर्‍या डावात चौथ्या दिवसअखेर चार बाद 112 धावांची खेळी करता आली. लढतीत 333 धावांनी पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाकडे अद्याप सहा विकेट शिल्लक आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताचा अजिंक्य रहाणे 18 आणि आर. शर्मा 6 धावांवर खेळत होते.

तिसर्‍या कसोटीत, चौथ्या दिवशी यजमानांनी 4 बाद 205 धावसंख्येवर दुसरा डाव घोषित केला. इंग्लंडने पहिल्या डावात 569 (घोषित) धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी भारताचा पहिला डाव 330 धावांवर आटोपला. ही कसोटी अनिर्णीत राखण्यासाठीही आता कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियाला खडतर परिश्रम घ्यावे लागतील. इंग्लंडकडून चौथ्या दिवशी दुसर्‍या डावात सलामीवीर अ‍ॅलिस्टर कुकने (नाबाद 70) शानदार फलंदाजी केली. दुसरा सलामीवीर रॉब्सन (13) बाद झाला. भुवनेश्वरने त्याला धवनच्या हाती झेल द्यायला लावला.
मोईनचे दोन बळी
गोलंदाजीत इंग्लंडकडून मोईन अलीने दोन गडी बाद केले. त्याने चेतेश्वर पुजारा (2) आणि विराट कोहलीला (28) बाद करून भारताला दोन मोठे धक्के दिले. याही वेळी विराट कोहलीचा मोठ्या खेळीचा प्रयत्न अपयशी ठरला. तसेच ज्यो रुटने एक गडी बाद केला. त्याने सलामीवीर शिखर धवनला 37 धावांवर खेळताना बाद केले. तत्पूर्वी, भारताकडून दुसर्‍या डावात रवींद्र जडेजाने तीन बळी घेतले.