आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविंद्र जडेजाची झुंजार खेळी, भारत-न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना बरोबरीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑकलंड - इडन पार्क येथे झालेला तिसरा एकदिवसीय सामना रोमांचक अंदाजात बरोबरीत सुटला. शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना रविंद्र जडेजाने मारलेला चेंडू वेळीच रोखत न्यूझीलंडने केवळ एक धाव दिली आणि सामना टाय झाला. यामुळे भारताचे मालिकेतील आव्हान कायम आहे. तर, न्यूझीलंड 2-0 ने आघाडीवर आहे.
रविंद्र जडेजाने आज भारताची शान राखली त्याने झुंजार खेळी करत 45 चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 66 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करुन तो नाबाद राहिला. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीमधील सातवे अर्धशतक ठरले. त्याने आधी आर. अश्विनसोबत सातव्या गड्यासाठी 85 धावांची भागीदारी केली. अश्विन बाद झाल्यानंतर त्याने भुवनेश्वर, मोहम्मद शमी आणि वरुण आरोन यांच्यासोबतीने भारताची धावसंख्या वाढविली.
सातवा सामना टाय
एकदिवसीय कारकिर्दितील टीम इंडियाने टाय केलेला हा सातवा सामना ठरला आहे.
अश्विनचे महत्त्वपूर्ण अर्धशतक
आर. अश्विनने आज दमदार खेळी करत भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. त्याने 46 चेंडूत एक षटकार आणि आठ चौकारांच्या मदतीने 65 धावा केल्या. याशिवाय कर्णधार धोनीने केलेले अर्धशतक देखील सामना बरोबरीत सोडवण्यात महत्त्वाचे राहिले.
पुढील स्लाइडवर, न्यूझीलंड 314 वर ऑल आऊट