आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE Ind Vs Nz Auckland Test Day 1 Live Score In Marathi

कर्णधार ब्रेंडन मॅक्लुम नाबाद 143, किवीजचे पहिल्या दिवसअखेर 329 रन्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑकलंड - इडन पार्क येथील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 4 विकेट्स गमावत 329 रन्स केले आहेत. भारताने नाणेफेक जिंकत किवीजला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले, ते टीम इंडियाला महागात पडले आहे. कर्णधार ब्रेंडन मॅक्लुमने 143 धावांची शानदार खेळी केली. कोरी अँडरसन 42 धावांसह मॅक्लुमसोबत नाबाद राहिला.
पहिल्या सत्रात तीन विकेट मिळविल्यानंतर भारतीय गोलंदाज फ्लॉप ठरले. शेवटच्या सत्रात जहीर खानने केन विल्यसनला बाद केले असले तरी धावांची गती रोखण्यात गोलंदाजांना यश आले नाही.
जहीरने दिला चौथा झटका
केन विल्यसनने त्याचा शानदार फॉर्म कसोटीमध्येही कायम ठेवत कारकिर्दीतील पाचवे शतक पूर्ण केले आहे. त्याने १७२ चेंडूंचा सामना करताना १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ११३ धावा केल्या आहेत. विल्यसनला बाद करुन जहीर खानने भारताला मोठे यश मिळवून दिले आहे. जहीरच्या गोलंदाजीवर केन धोनीकडे झेल देत बाद झाला. केनने कर्णधार मॅक्लुमसोबत २२१ धावांची भागीदारी केली.
कर्णधार मॅक्लुमचे शतक
न्यूझीलंडचा कर्णधार मॅक्लुमने भारतीय गोलंदाजांना मनसोक्त धुवून काढले आहे. त्याने चौकार ठोकत शतक पूर्ण केले आहे.