वेलिंग्टन - वेलिंग्टन कसोटीत भारतीय संघाने पहिल्या डाव्यात घेतलेल्या 246 धावांच्या आघाडीचा पाठलाग करणा-या न्यूझीलंड संघाने तिस-या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाच विकेट्स गमावत 252 धावा केल्या आहेत. ब्रेंडन मॅक्यूलम (114) आणि वॉल्टिंग (52) नाबाद राहिले आहेत. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी 158 धावांची भागीदारी केली आहे.
पहिली विकेट झटपट गमावल्यानंतर न्यूझीलंडला दुसरा झटका केन विलियम्सनच्या (7) रुपाने मिळाला. त्याला जहीर खानने बाद केले. दुस-या दिवशी नाबाद राहिलेला रुदरफर्डही फारकाळ मैदानावर टीकू शकला नाही. जहीरने सलामीवीर रुदरफर्डला कर्णधार महेंद्रसिंह धोनी करवी झेल बाद केले. रुदरफर्डने 6 चौकारांसह 35 धावांची खेळी केली.
शमीची गोलंदाजी
किवींचा कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलमसह संघाचा धावफलक हालता ठेवणारा ट़ॉम लाथमला मोहम्मद शमीने तुंबूत परत पाठविले. लाथमने 64 चेंडूत 29 धावा केल्या.