आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने मालिका जिंकली :16 षटकारांसह रोहित शर्माचे द्विशतक, कांगारूंवर 57 धावांनी मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - भारतीय संघासाठी करा किंवा मरा, असा सामाना असल्यामुळे पहिल्या चेंडूपासूनच भारतीय फलंदाजांनी दमदार खेळ करीत पाहुण्या ऑस्ट्रेलियाला भारताने 384 धावांचे आव्हान दिले होते. मात्र त्याचा पाठलाग करताना कांगारूंना 45 षटकात 326 च धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून जेम्स फॉकनर (116) शेवटपर्यंत लढला. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
मध्यमगती गोलंदाज शमी अहमदने अॅरोन फिंचला केवळ 5 धावेवर पायचित केले व ऑस्ट्रेलियाची हवा काढून टाकली. त्यानंतर सलामीवीर ह्यूजेस (23), हडीन (40), कर्णधार जॉर्ज बेली (4), व्होजेस (4) यांना बाद करण्यात भारताला यश मिळाले. मात्र, ग्लेन मॅक्सवेलने भारतीय गोलंदाजांची थोड्या वेळ चांगलीच दमछाक केली. त्याने केवळ 22 चेंडूत 7 षटकार व तीन चौकार ठोकत 60 धावा केल्या. त्याने पहिल्या चेंडूपासून प्रहार करण्यास सुरुवात केली होती. मात्र, विनयकुमारने त्याला जडेजाद्वारे झेलबाद केले. त्याआधी कुमारला मॅक्सवेलने दोन षटकार ठोकले होते.
मॅक्सवेल आक्रमक खेळी करून बाद झाल्यानंतर त्याच्या जागेवर खेळायला आलेल्या शेन वॅटसनने ही भारतीय गोलंदाजांना चांगलेच तडाखे दिले. त्यानेही केवळ 22 चेंडूत 6 षटकार व 2 चौकार ठोकत 49 धावा केल्या. मात्र, जडेजाच्या गोलंदाजीवर तो शमीकडे झेल देऊन बाद झाला.
त्यानंतर या दोघांची उणीव गोलंदाज जेम्स फॉकनरने भरून काढले. त्यानेही भारतीय गोलंदाजांची पिसे काढताना चौफेर षटकार व चौकार ठोकले. त्याने केवळ 57 चेंडूत 11 चौकार व 5 षटकारासह शतक ठोकले. अखेर तो 116 धावांवर शमी अहमदच्या गोलंदाजीवर शिखर धवनकडे झेल देऊन बाद झाला. त्याने 73 चेंडूत 11 चौकार, 6 षटकार ठोकत 116 धावांची खेळी केली.

शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीच्या जोडीने 17 षटकांत शानदार शतक पूर्ण केले. दुपारी तीनच्या सुमारास पावसामुळे खेळ थांबवण्यात आला होता. मात्र पुन्हा खेळ सुरु झाला तेव्हा भारताचे दोन खंदे फलंदाज बाद झाले. शिखर धवनने पावसाआधी 58 धावा केल्या होत्या. पुन्हा खेळ सुरु झाला आणि दोन धावा काढून तो बाद झाला. त्यानंतर आलेला विराट कोहली पहिली धाव घेतानाच धावबाद झाला. त्यानंतर सुरेश रैना पायचित बाद झाला. रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीने नंतर धावांचा डोंगर उभारला. निर्धातीत 50 षटकात भारताने 6 गडी बाद 383 धावा केल्या. रोहित शर्माने 37 व्या षटकात शतक पूर्ण केले. 114 चेंडूत त्याने 6 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. महेंद्रसिंह धोनीने 38 चेंडूत वेगवान 62 धावा केल्या. रोहितने शानदार द्विशतक केले. त्याने 158 चेंडूत 16 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 209 धावा केल्या. सुरेश रैना पायचित बाद झाला. त्याने 30 चेंडूत 28 धावा केल्या. युवराजने 12 धावा केल्या.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सातवा एकदिवसीय सामना एम. चिन्नास्वामी मैदानावर होत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. मालिकेत दोन्ही संघ 2-2 गुणांनी बरोबरीत आहेत.
भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने संघात एक बदल केला आहे. त्याने फिरकीपटू अमित मिश्राला बाहेर ठेवत विनयकुमारला संघात स्थान दिले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघात देखील एक बदल करण्यात आला आहे. त्यांनी जायबंदी मिचेल जॉन्सन ऐवजी कोल्टर नीलला संधी दिली आहे.