आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE India Vs Australia Brisbane Test Day 2 Score

ब्रिस्बेन TEST दुसरा दिवस : ऑस्ट्रेलियाचे 4 फलंदाज बाद, उमेशमुळे भारताचे पुनरागमन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - वॉटसन बाद झाल्यानंतर जल्लोष करताना भारतीय खेळाडू.
ब्रिस्बेन - येथील गब्बा मैदानावर सुरू असलेल्या दुस-या कसोटी सामन्याच्या दुस-या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाचा स्थिती 4 बाद 221 अशी झाली आहे. फलंदाजीत फारशी चांगली कामगिरी करता आली नसली तरी, उमेश यादवच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने सामन्यात पुनरागमन केल्याचे चित्र आहे. ऑस्ट्रेलियाच्या आजच्या चारपैकी तीन विकेट या उमेश यादवने घेतल्या आहेत.
भारतीयं फलंदाजांनी 400 चा टप्पा गाठून दिल्यानंतर गोलंदाजांनीही आपण जबाबदारी पेलण्यास सार्थ असल्याचे दाखवून दिले. कांगारुंच्या फलंजादीच्या पहिल्याच सत्रात भारतीय गोलंदाजांनी तिघांना बाद केले. उमेश यादवने डेव्हीड वॉर्नरला 29 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्याच्या पाठोपाठ आश्विनने वॉटसनला 25 धावांवर बाद केले. दुस-या बाजुने सलामीवीर रॉजर्सने एक बाजू लावून धरत अर्धशतक केले. पण उमेश यादवने त्याला 55 धावांवर बाद करत मोठी खेळी करण्यापासून रोखले. त्यानंतर मार्शलाही 32 धावांवर बाद करत यादवने ऑस्ट्रेलियाचा चौथा धक्का दिला.
दरम्यान, भारताचा पहिला डाव 408 धावांवर संपुष्टात आला आहे. नाथन लियॉनने अखेरचे दोन गडी बाद करत भारताचा डाव संपवला. सामन्यातून पदार्पण करणा-या जोश हेजलवूडला 5 विकेट मिळाल्या. मुरली विजयने 144 तर अजिंक्य राहाणेने 81 धावांची खेळी करत भारताला 400 चा टप्पा गाठण्यात मदत केली. त्यात आर अश्विनने (35) आणि कर्णधार धोनीनेही (33) हातभार लावला.

हेजलवूडचा पंच
जोश हेजलवूडने पहिल्याच सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत पाच बळी घेतले. कर्णधार धोनी त्याचा पाचवा बळी ठरला. धोवी 33 धावा करून बाद झाला. तर आर अश्विनलाही हेजलवूजडनेच बाद केले.

रोहित फ्लॉप
रोहित शर्मा मात्र सपशेल फ्लॉप ठरला. शेन वॉटसनच्या गोलंदाजीवर सेकंड स्लीपमध्ये उभ्या असलेल्या स्टीव्हन स्मिथने त्याचा झेल अलगद टिपला. त्याने 32 धावा केल्या.

राहाणेच्या 81 धावा
दिवसाच्या तिस-या षटकातच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. ओव्हरनाईट नाबाद राहिलेल्या अजिंक्य राहाणेला हेजलवूडने एका उत्कृष्ट चेंडूवर बाद केले. ऑफ स्टंपकडे जाणारा चेंडू लेट स्विंग झाला आणि राहाणेच्या बॅटच्या किना-याला स्पर्श करून थेट विकेटकिपर हॅडीनच्या हातात पोहोचला. राहाणेने 8 चौकार लगावत 81 धावांची खेळी केली. पहिल्या दिवसाच्या धावसंख्येत त्याला केवळ 7 धावा जोडता आल्या.

त्याआधी गर्मीमुळे पहिल्या दिवशी केवळ 83 षटकांचाच खेळ होऊ शकला. मुरली विजय (144 रन) च्या शतकाने भारताला सुस्थितीत नेऊन पोहोचवले. ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणा-या हेजलवूडने दोन बळी घेत सर्वांना आश्चर्यचकित केले.

मिशेल मार्श गोलंदाजी करू शकणार नाही
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्श गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे तो सामन्यात गोलंदाजी करू शकणार नाही. पहिल्याच दिवशी बॉलींग रन अप दरम्यान स्नायू दुखावल्याची तक्रार करत तो पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यानंतर तो गोलंदाजी करू शकणार नसल्याचे फिजियोने स्पष्ट केले. मार्शने पहिल्या दिवशी धवनची महत्त्वाची विकेट घेतली होती.

भारताच्या पहिल्या डावाची आकडेवारी
एकूण धावा 408/10
मुरली विजय - 144
अजिंक्य राहाणे - 81
रोहित शर्मा - 32
कर्णधार धोनी - 33
अश्विन - 35
शिखर धवन - 24
विराट कोहली - 19
चेतेश्वर पुजारा - 18
गोलंदाजी
जोश हेजलवूड - 5/68
मिशेल मार्श - 1/14
नाथन लियॉन - 3/105
शेन वॉटसन - 1/39

पुढे पाहा. ब्रिस्बेन टेस्टच्या दुस-या दिवसाचे PHOTO