आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE India Vs Australia Brisbane Test Day 4 Score In Marathi

ब्रिस्बेन कसोटी: चार विकेट राखून ऑस्ट्रेलिया विजयी, मालिकेत 2-0 ने आघाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन - यजमान ऑस्ट्रेलियाने पाहुण्या भारतीय संघाला सलग दुसर्‍या कसोटीत मात देत मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. येथील गबा मैदानावरील दुसर्‍या कसोटीच्या चौथ्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा दुसरा डाव 224 धावात गुंडाळला. टीम इंडियाने फक्त 128 धावांची आघाडी घेतली, या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सहा विकेट गमावल्या आणि चार गडी राखत विजय संपादन केला.

भारतीय फलंदाजी कोसळली

त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या मिशेल जॉन्सनने 61 धावा देत 4 फलंदाजांना बाद केले. फिरकी गोलंदाज लॉयनने 33 धावा देत दोन विकेट घेतल्या.
एकट्या शिखर धवनने (81) शानदार खेळी केली, भारताचे इतर फलंदाज आज ऑस्ट्रेलियाच्या मार्‍यापुढे निष्प्रभ ठरले. त्यामुळे टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारु शकली नाही.
धवनचे शतक हुकले
एकट्या धवनने भारताचा मोर्चा सांभाळला. त्याने उमेश यादवसोबत 60 धावांची भागीदारी केली, मात्र तो शेवटपर्यंत क्रिजवर पाय रोवून उभा राहू शकला नाही. नॅथन लॉयनने त्याला पायचित केले. धवन 81 धावांवर बाद झाला. भारताने 100 हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.
लंचआधी टीम इंडियाची फलंदाजी विस्कळीत
भारतासाठी पहिले सत्र अतिशय निराशाजनक राहिले. चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 97 रन्सची आघाडी घेतली होती, टीम इंडिया यापासून फक्त 26 धावा मागे होती. हे 26 धावांचे अंतर कापतान टीम इंडियाला चार विकेट गमवाव्या लागल्या. सराव करताना जखमी झालेल्या शिखर धवनच्या जागेवर आलेला विराट कोहली एका धावेवर तंबूत परतला. मिशेल जॉन्सनने त्याला बाद केले.
संघाच्या 10 धावा झाल्या असताना जॉन्सनच्या ओव्हरवर पाहुण्यासंघाला दुहेरी झटका मिळाला. जॉन्सनच्या गोलंदाजीवर अजिंक्य राहाणे (10) नाथन लॉयनकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेला रोहित शर्मा खातेही न उघडता विकेटकीपर हॅडिनकडे झेल देऊन तंबूत परतला.
कर्णधार धोनीकडून काही आशा होत्या, मात्र तो देखील भोपळाही न फोडता परतला. त्याला कसोटी पदार्पण करणारा नवखा गोलंदाज जॉश हेजलवूडने एलबीडब्ल्यू बाद केले.
आश्विन - पुजाराचा संघर्ष
आर. आश्विन आणि चेतेश्वर पुजारा या दाघांनी भारताला आघाडी मिळवून दिली. या दोन्ही फलंदाजांनी सहाव्या विकेटसाठी 30 रन्सची भागीदारी केली. आश्विनने (28) चांगली खेळी करत भारताला आघाडी मिळवून दिली आणि मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला.
चेतेश्वर पूजारा अर्धशतक पूर्ण करणार असे वाटत असताना 43 रन्सवर बाद झाला.
तिसर्‍या दिवसाची स्थिती
दुसर्‍या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 505 धावात गुंडाळला. दुसर्‍या डावात भारताने दिवस अखेर ओपनर मुरली विजयची महत्त्वाची विकेट गमावत 71 रन्स केले आणि यजमान संघाच्या 97 धावांच्या आघाडीपासून 26 रन्स मागे राहिले.

फोटो - ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ख्रिस रॉजर्स

पुढील स्लाइडमध्ये ब्रिस्बेट टेस्टची LIVE छायाचित्रे