ब्रिसबेन - ऑस्ट्रेलिया विरुध्द भारत दरम्यान एलन बॉर्डर फील्ड मध्ये होत असलेल्या अनऑफिशियल कसोटीमध्ये भारताच्या नमन ओझाने डबल सेंचूरी ठोकले. ओझाने नाबाद 219, कर्णधार मनोज तिवारी 83 आणि जीवनज्योत सिंह 56 धावांच्या जोरावर इंडिया 'ए' संघाने आपला पहिला डाव 9 विकेटवर 475 धावांवर घोषित केला.
कसोटीच्या दुस-या दिवशी चहापानाच्या वेळेपर्यंत यजमान ऑस्ट्रेलियाच्या 'ए' संघाने 1 विेकेटच्या मोबदल्यात 51 धावा बनविल्या आहेत. फिलिप ह्युग्स आणि पीटर फॉरेस्ट नाबाद आहेत. यजमान आस्ट्रेलियाला पहिला झटका जसप्रीत बुमराहने दिला. सलामीवीर डूलनला त्याने 12 धावांवर तंबूत पाठवले.
नमन ओझाची डबल सेंचूरी
भारतीय संघाने पहिल्या दिवसाच्या 304/6 वर खेळायला सुरुवात केली. ओव्हरनाइट 82 धावांवर नाबाद राहिलेल्या नमन ओझाने जेम्स फॉकनर, बेन कटिंग, मोइसेस हेन आणि मिचेल मार्शसारख्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. ओझाने 250 चेंडूचा सामना करत 29 चौकार आणि 8 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 219 धावा केल्या.
तिवारीला शतकाची हुलकावणी
सलामीवीर रॉबीन उथप्पा आणि अंबाती रायडू यांच्या लागोपाठ विकेट गेल्यानंतर भारतीय संधाचा कर्णधार तिवारी खेळपट्टीवर आला. तिवारीने 118 चेंडूचा सामना करत 12 चौकार आणि एक षटकाराच्या सहाय्याने 83 धावा केल्या.
(फोटोओळ- दुहेरी शतक लगावल्यानंतर आनंदी मुद्रेत नमन ओझा)
पुढील स्लाइडवर पाहा, सामन्यादरम्यानची निवडक छायाचित्रे...