आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE India Vs England Cardiff ODI Latest Score Updates In Marathi

2nd ODI LIVE: कार्डिफमध्ये सुरेश रैनाचे शतक, इंग्लंडला 305 रन्सचे आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्डिफ - येथील सोफिया गार्डन मैदानावर सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यात टीम इंडियाने सहा विकेट गमावत 304 रन्स केले आहेत. रविचंद्र अश्विन आणि रविंद्र जडेजा नाबद राहिले. सुरेश रैनाचे शतक आणि अजिंक्य राहाणे व कर्णधार धोनीच्या अर्धशतकाच्या बळावर टीम इंडियाने तीनशे रन्सचा पल्ला गाठला आहे. संथ सुरवात करुनही टीम इंडियाने एवढ्या धावा उभारल्याने विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

रोहित बाद
रोहित शर्माने एक हाती मोर्चा सांभाळत करिअरमधील 23वे अर्धशतक पूर्ण केले आणि बाद झाला. ट्रेडवेलच्या गोलंदाजीवर जोसकडे झेल देत तो बाद झाला त्याने चार चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 52 रन्स केले.
राहाणेचे अर्धशतक हुकले
अजिंक्य राहाणे क्रिजवर स्थिर झाला असताना 24 व्या ओव्हरमध्ये एका चुकीमुळे आऊट झाला. त्याने चार चौकारांनी सजलेली 41 रन्सची शानदार खेळी केली.
सलग दोन विकेट
टीम इंडियाला पहिला झटका 8व्या ओव्हरमध्ये बसला. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत 3-1 ने सपाटून मार खाल्ल्यानंतरही टीम इंडियामध्ये आज काही वेगळेपणा दिसत नाही. कसोटीत फ्लॉप ठरलेल्या शिखर धवनने येथेही काही कमाल दाखविली नाही. त्याने क्रिस व्होक्सच्या गोलंदाजीवर जोस बटलरकडे सोपा झेल दिला. त्याने फक्त 11 रन्स केले. त्याच्या जागेवर आलेला विराट कोहली त्याच ओव्हरमध्ये भोपळाही न फोडता परतला.
टीम इंडियाची संथ सुरवात
इंग्लंडकडुन पहिली ओव्हर जेम्स अँडरसनने टाकली. ओपनिंगला आलेला रोहित शर्मा या ओव्हरमध्ये एक रन देखील घेऊ शकला नाही. दुसर्‍या ओव्हरसाठी क्रिस व्होक्सच्या हातात बॉल देण्यात आला. आता स्ट्राइकला शिखर धवन होता. तो देखील एका रनसाठी चाचपडत राहिला. तिसर्‍या ओव्हरच्या दुसर्‍या बॉलवर टीम इंडियाचे खाते उघडले, ते देखील 'वाइड' बॉलवर.

छायाचित्र - रोहित शर्मा.