आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE India Vs England Manchester Test Day 1 Score News In Marathi

कसोटी : भारताचा पहिल्या डावात 152 धावा, इंग्लंडची चांगली सुरूवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मँचेस्‍टर - भारताने मँचेस्टरमध्‍ये चालू असलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरूध्‍द सर्व विकेट गमावून 152 धावा केल्या आहेत. भारताने दिलेले लक्ष्‍य गाठण्‍यासाठी इंग्लंडने आतापर्यंत 8 धावा केल्या आहेत. सध्‍या सॅम रॉब्सन आणि अॅलेस्टर कुक क्रिजवर आहेत.

भारताकडून कप्तान महेंद्रस‍िंग धोनीने ( धावा 71) सर्वाधिक धाव केल्या.

आठ धावांवर चार फलंदाज तंबूत
भारताची सुरवात खराब झाली आहे. सुरवातीची फळी एका नंतर एक बाद झाली आणि केवळ 8 धावांवर भारत चार बाद अशा स्थितीत पोहोचला. कित्येक दिवसानंतर टीम इंडियामध्ये परतलेल्या गौतम गंभीरच्या रुपाने भारताला पहिला झटका बसला. तो केवळ 4 धावांवर स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर इंग्लंडला एका पाठोपाठ एक विकेट मिळत गेल्या. मुरली विजय आणि विराट कोहली भोपळा देखील फोडू शकले नाही. या दोघांना जेम्स अँडरसनने बाद केले. त्यानंतर अजिंक्य राहाणेही स्वस्तात परतला.

चेतेश्वर पुजाराला ब्रॉडने परत पाठवेल
जेम्स अँडरसनने टाकलेल्या तीसर्‍या षटकात भारताला दोन धक्के बसले. त्यानंतर चौथ्या षटकात स्टुअर्ट ब्रॉडने पुजाराला शुन्यावर बाद केले.
पावसाअभावी नाणेफेकला उशीर
पावसाअभावी नाणेफेकला थोडा उशीर झाला आहे. दोन्ही संघ सध्या मालिकेत 1-1 ने बरोबरीत असून भारताने दुसरा, तर इंग्लंडने तिसरा कसोटी सामना जिंकला आहे. दोन्‍ही संघ सामन्‍यामध्‍ये विजयासाठी आतुर आहेत.

उभय संघ पुढील प्रमाणे -
भारत - गौतम गंभीर, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, महेंद्र सिंह धोनी, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, वरुण आरोन आणि पंकज सिंह
इंग्लंड - एलिस्टर कुक (कर्णधार), सॅम रॉबसन, गॅरी बॅलेंस, इयान बेल, जो रूट, मोइन अली, जोस बटलर, क्रिस वोक्स, क्रिस जॉर्डन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स एंडरसन