आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE India Vs New Zealand 1stODI Live Score In Marathi

भारत 24 धावांनी पराभूत, विराट कोहलीची शतकी खेळी व्‍यर्थ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपियर - मॅक्लिन पार्क येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्‍युझीलंडने भारताला 24 धावांनी पराभूत केले. 293 धावांचा पाठलाग करतांना भारतीय संघ 48.4 षटकात सर्वबाद 268 धावा करु शकला. विराट कोहलीची शतकी खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.
विजयासोबतच यजमान न्‍युझीलंड संघाने पाच एकदिवसीय सामन्‍यामध्‍ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. नाबाद 68 धावा करणारा आणि 2 गडी बाद करणारा अँडरसनला 'सामनाविराचा' पुरस्‍कार मिळाला.

न्‍युझीलंडच्‍या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना धावासाठी झगडावे लागले. न्‍युझीलंडच्‍या गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी केली. मिशेलने 68 धावा देत रोहित शर्मा, विराट कोहली, कर्णधार धोनी, आणि रवींद्र जडेजा या फलंदाजांना बाद केले.

293 धावांचा पाठलाग करतांना भारतीय संघाची चांगली सुरुवात झाली नाही. रोहित शर्मा 3 धावांवर बाद झाला, त्‍यानंतरच शिखर धवन 32 धावा काढून बाद झाला.

अजिंक्‍य रहाणे-7, आणि सुरेश रैना- 18 धावंवर बाद झाल्‍यानंतर विराट कोहली-123 आणि धोणी - 40 यांनी डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु 43 व्‍या षटकात धोनी बाद झाला. रवींद्र जडेजा गोलंदाजीत निष्‍फळ ठरला. तर फलंदाजीत त्‍याला भोपळाही फोडता आला नाही्.

आयसीसी क्रमवारीत 8 व्‍या स्‍थानी असलेल्‍या न्‍युझीलंडने चॅम्पियन्‍स सारखा खेळ केला. गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी करत फलदाजांना जखडून ठेवण्‍यात यश कमवले तर क्षेत्ररक्षकांनी अत्‍यंत चपळतेने क्षेत्ररक्षण केले.
सविस्‍तर बातमी वाचण्‍यसाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...