आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE India Vs New Zealand 2nd ODI Score In Marathi

पावसाने धुतले - न्यूझीलंडने मारले, भारत 0-2 ने पिछाडीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅमिल्टन - सेडॉन पार्क येथे आज झालेल्या दुस-या एकदिवसीय समान्यात डकवर्थ लुइस नियमानुसार भारत पराभूत झाला आहे. 42-42 षटकांच्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत सात गडी गमावत 271 धावा केल्या. नियमानुसार भारताला 42 षटकांमध्ये 297 धावांचे लक्ष्य देण्यात आले. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 41.3 षटकात 9 गडी बाद 277 धावा केल्या. शेवटचे तीन चेंडू शिल्लक असताना पुन्हा पावसाने हजेरी लावली. भारताच्या विजयाची लक्षणे अत्यंत धुसर असल्यामुळे पंचांनी न्यूझीलंडला 15 धावांनी विजयी घोषित केले.
भारताकडून कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 56 तर, विराट कोहलीने 78 धावांची शानदार खेळी केली. मात्र ते भारताला विजयी करु शकले नाही. मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा 1-1 धावांवर नाबाद राहिले. न्यूझीलंडच्या टिम साऊथीने 72 धावांसह 4 गडी बाद केले. या पराभवामुळे आयसीसी रॅकिंगमध्येही भारत एका पायरीने खाली आला आहे.
विराटचे अर्धशतक
एका बाजूने संघाची पडझड सुरु असताना विराटने दुस-या बाजूने अर्धशतक पूर्ण केले. त्याने 23 ओव्हरमध्ये नाथनच्या चेंडूवर एक धाव घेऊन अर्धशतक पूर्ण केले. एकदिवसीय कारकिर्दीतील त्याचे हे 29 वे अर्धशतक होते.
केवळ 37 धावांवर भारताचा दुसरा मोहरा गळाला. रोहित शर्माने 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 20 धावा केल्या होत्या. त्याच्यानंतर मैदानात आलेला पहिल्या सामन्यातील शतकवीर विराट कोहलीने चौकारासह खाते खोलले. विराटची साथ मिळाल्यानंतर रोहित शर्माही फॉर्ममध्ये आला.

मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्यान 55 धावा देत 3 गडी बाद केले. भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, सुरेश रैना आणि रविंद्र जडेजा यांनी एक-एक गडी बाद केला.
न्यूझीलंडकडून केन विलसन (77) आणि रॉस टेलर (57) यांनी अर्धशतकी खेळी केली. कोरी अँडरसनने केवळ 17 चेंडूत 2 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकारांची अतिषबाजी करत 44 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सलामीवीर मॉर्टीन गुप्तिलने 44 धावा केल्या.