आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE India Vs West Indies Kolkata Test Live Score Tendulkar Special

कोलकात्यात पहिल्या दिवशी चमकला सचिन, कसोटी पदार्पणात शमीने घेतले 4 बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - कसोटी पदार्पण करत असलेला मोहम्मद शमी आणि फिरकीपटू आर. आश्विन यांच्या अचूक गोलंदाजीपुढे वेस्ट इंडिज संघाचा पहिला डाव 234 धावांवरच रोखला गेला. शमीने 71 धावा देत 4 गडी बाद केले तर, अश्विनने 52 धावा दिल्या आणि वेस्ट इंडिजच्या दोन मोह-यांना टिपले.
दिवस अखेर भारतीय संघाने एकही गडी न गमावता 37 धावा केल्या. शिखर धवन 21 आणि मुरली विजय16 धावा काढून नाबाद राहिले.
वेस्ट इंडिजकडून मार्लन सॅम्‍युल्‍सलाने 11 चौकार आणि 2 षटकार ठोकत 65 धावांची खेळी केली. 149 वी कसोटी खळणारा शिवनारायण चंद्रपॉलने 79 चेंडूंचा सामना करत 36 धावा केल्या.
सचिन तेंडुलकरच्‍या 199व्‍या कसोटी सामन्‍यामुळे संपूर्ण कोलकाता सचिनमय झाला आहे. मोहम्मद शमीने आपल्‍या पहिल्‍याच सामन्‍यात अचूक टप्‍प्‍यावर गोलंदाजी करीत पाहुण्‍या विंडीज फलंदाजांना बांधून ठेवले. स्विंगचा अचूक फायदा घेत त्‍याने आघाडीच्‍या चार विकेट घेतल्‍या. अर्धशतकवीर सॅम्‍युल्‍सला बाद केल्‍यानंतर त्‍याने लगेचच रामदीनचा 4 धावांवर त्रिफळा उडवला. तत्‍पूर्वी डॅरेन ब्राव्‍हो चोरटी धाव घेताना 23 धावांवर बाद झाला.

सचिन मॅजिक

कर्णधार धोनीने चहापाना आधीच्या शेवटच्या षटकासाठी सचिनकेड चेंडू दिला. त्याच्या हातात चेंडू येताच संपूर्ण स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याने चौथ्याच चेंडूवर शेन शिलिंगफोर्डला पायचित केले.

सचिनने पहिला चेंडू लेग ब्रेक टाकला, दुसरा गुगली आणि चौथा सरळ रेषेत टाकत शेनला फसवले. शेनने 5 धावा केल्या आणि आपले नाव इतिहासात कायमचे नोंदवले.
कोलकात्यात कसोटी कारकीर्दीतील सचिनची ही पाचवी विकेट आहे. 21 मार्च 2001 ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 31 धावा देत तीन गडी बाद केले होते. 16 फेब्रुवारी 1999 रोजी त्याने कोलकात्यात पहिली विकेट घेतली होती. तेव्हा त्याची शिकार ठरला होता पाकिस्तानचा मोईन खान.