आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE Indian Premier League, 3rd Match: Kings XI Punjab V Rajasthan Royals At Pune

राजस्थान रॉयल्सची किंग्ज इलेव्हन पंजाबवर २६ धावांनी मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वीरेंद्र सेहवाग शून्यावर बाद - Divya Marathi
वीरेंद्र सेहवाग शून्यावर बाद
पुणे - अष्टपैलू जेम्स फॉकनरने केलेली ४६ धावांची अफलातून खेळी आणि बळींच्या भरवशावर राजस्थाने किंग्ज इलेव्हन पंजाबवर "रॉयल' विजयाची नोंद केली. आयपीएलच्या यंदाच्या सत्रातील पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबला २६ धावांनी धूळ चारली.

पुण्याच्या गहुंजे मैदानावर खेळल्या गेलेल्या या लढतीत पंजाबने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीस उतरलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात अत्यंत दयनीय झाली. सलामीवीर अजिंक्य रहाणेने भोपळाही फोडता दुसऱ्याच षटकात तंबूचा रस्ता धरला. त्यानंतर संघाच्या धावसंख्येत धावांचीच भर पडली आणि संजू सॅमसनही वैयक्तिक धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेला नायरही धावांवरच अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. मात्र, त्यानंतर स्मिथ दीपक हुडा यांनी ५१ धावांची शानदार भागीदारी करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. फॉकनरने षटकार चौकारांच्या मदतीने ४६ धावांची खेळी केली. स्मिथनेही ३० धावांचे योगदान दिले. शिवाय दीपक हुडाने ३३ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान देत संघाला सन्मानजनक धावसंख्येवर नेऊन पोहोचवले. राजस्थानने २० षटकांत (७ गडी बाद) १६२ धावा काढल्या. किंग्जकडून अनुरित सिंहने २३ धावांवर जॉन्सनने ३४ धावा देत बळी मिळवले.

प्रत्युत्तरात फलंदाजीस उतरलेल्या पंजाबला डावाच्या पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसला. सलामीवीर वीरेंद्र सेहवाग साउथीच्या पहिल्याच चेंडूवर सॅमसनकडे झेल देत बाद झाला. त्यानंतर मुरली विजयने संयमी खेळ करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या बाजूने त्यास योग्य साथ मिळाली नाही. वृद्धिमान साहा आणि त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल प्रत्येकी धावा काढून तंबूत परतले. दरम्यान, अक्षर पटेल (२४), मिलर (२३) जॉर्ज बेली (२४) यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. किंग्ज इलेव्हनचा संघ २० षटकांत गड्यांच्या बदल्यात १३६ धावाच काढू शकला आणि त्यांना २६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. रॉयल्सकडून साउथीने फॉकनरने गडी बाद केले.
फॉकनर सामन्याचा हीरो
राजस्थानरॉयल्सच्या विजयात अष्टपैलू खेळाडू जेम्स फॉकनरचा सिंहाचा वाटा होता. त्याने षटकार आणि चौकारांच्या मदतीने ३३ चेंडूंत ४६ धावांची अप्रतिम खेळी केली. वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनच्या गोलंदाजीवर दोन आणि अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्याने एक शानदार षटकार लगावला. गोलंदाजीतही कमाल करत त्याने मॅक्सवेल, बेली आणि मिशेल जॉन्सनला बाद केले. त्यामुळेच रॉयल्सचा विजय सुकर झाला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, सामन्यातील काही खास फोटो...