मुंबई - आयपीएल-8 च्या 7 व्या सामन्यात पंजाब किंग्स XI ने ठेवलेले 178 धावांचे आव्हान पूर्ण करण्यात मुंबई इंडियन्सच्या संघाला अपयश आले आहे. पण पंजाबने सामना जिंकला असला तरी
हरभजन सिंगने फटकेबाजी करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
नाणेफेक जिंकत मुंबईने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबने कर्णधार जॉर्ज बेलीच्या 32 चेंडूत केलेल्या 61 धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाबने मुंबईसमोर 178 धावांचे आव्हान उभारले होते. चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या षटकांत पंजाबचा डाव कोलमडला होता. पण अखरेच्या दहा षटकांत 90 धावा खेचत पंजाबच्या फलंदाजांनी चांगली धावसंख्या उभारली होती.
प्रत्युत्तरात 177 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईला मात्र सुरुवातीपासूनच पंजाबच्या गोलंदाजांनी बांधून ठेवले. त्यांच्या पहिल्या पाच विकेट अत्यंत कमी धावात गेल्या. पण हरभजन मैदानावर आला आणि त्याने सामन्याचे चित्रच पालटून टाकले. त्याने पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई करत अर्धशतक पूर्ण केले. सुचितने त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी विजय जवळपास खेचून आणला होता, पण शेवट चांगला करण्यात त्यांना अपयश आले.
पंजाबला पहिला धक्का विरेंद्र सेहवाग (36) च्या रुपाने बसला. विरेंद्रचा झेल हरभजन सिंगच्या
मुंबईने जिंकले नाणेफेक
मुंबई इंडियन्सने नाणे फेक जिंकत पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सला त्यांच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सात गडी राखून पराभूत केले होते. तर पंजाब किंग्स XI चा राजस्थान रॉयल्सने 26 धावांनी पराभव केला होता. किंग्स XI मध्ये ग्लेन मॅक्सवेल, डेविड मिलर, वीरेंद्र सहवाग, मुरली विजय, मिचेल जॉनसन यांसारखे बलाढ्य खेळाडू आहेत, जे कोणत्याही संघासमोर धावांचा डोंगर उभा करू शकतात. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि सलामी फलंदाज रोहित शर्माकडून मोठ्या अपेक्षा आहेत. रोहितने कोलकाता नाइटराइडर्सविरूध्द 98 धावा केल्या होत्या.
प्लेइंग इलेवन:
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कप्तान), एरॉन फिंच, अंबाती रायुडू, आदित्य तारे, कोरे एंडरसन, कीरन पोलार्ड, हरभजन सिंह, लसिथ मलिंगा, विनय कुमार, पवन सुयाल, जगदीशा सुचित
किंग्स इलेवन XI : जॉर्ज बैली (कप्तान), वीरेंद्र सहवाग, मुरली विजय, ग्लेन मैक्सवेल, डेविड मिलर, रिद्धिमान साहा, मिचेल जॉनसन, अक्षर पटेल, अनुरीत सिंह, संदीप शर्मा आणि ऋषि धवन