आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE Indian Premier League : Kolkata Knight Riders V Mumbai Indians Match Update

IPL-8 : ओपनिंग सामन्यात केकेआरने विजयाचे खाते उघडले !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गौतम गंभीर - Divya Marathi
गौतम गंभीर
कोलकाता - इंडियन प्रीमियर लीग-८ च्या पहिल्या सामन्यात गतविजेता कोलकाता नाइट रायडर्सने जबरदस्त कामगिरी करताना मुंबई इंडियन्सला ७ विकेटने पराभूत केले. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना रोहितच्या (नाबाद ९८) खेळीच्या बळावर बाद १६८ धावा काढल्या. प्रत्युत्तरात केकेआरने हे लक्ष्य १८.३ षटकांत गड्यांच्या मोबदल्यात सहजपणे गाठले. कोलकाताकडून कर्णधार गौतम गंभीर (५७), मनीष पांडे (४०) आणि सूर्यकुमार यादव (२० चेंडू, षटकार, चौकार, नाबाद ४६ धावा) विजयाचे शिल्पकार ठरले.

तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्मा (नाबाद ९८) आणि कोरी अँडरसन (नाबाद ५५) यांच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर प्रथम फलंदाजी करताना बाद १६८ धावा काढल्या. टॉस जिंकून कोलकाता नाइट रायडर्सने मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. मात्र, मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर अ‍ॅरोन फिंच अवघ्या धावा काढून बाद झाला. यानंतर आदित्य तारे (७) खास कामगिरी करू शकला नाही. तो सकिब-अल-हसनचा बळी ठरला. मुंबईची तिसरी विकेट अंबाती रायडूच्या (०) रूपाने पडली. मुंबईची टीम अडचणीत सापडली असून मोठा स्कोअर करणार नाही, असे एकवेळ वाटत होते. मात्र, कर्णधार रोहितने कमाल करताना नाबाद ९८ धावा ठोकल्या. अँडरसनने त्याला चांगली साथ दिली. त्यानेही अर्धशतक पूर्ण केले. या सत्रातील पहिले शतक पूर्ण करण्यासाठी रोहितला धावा कमी पडल्या. त्याने १२ चौकार, षटकार मारले. कोरी अँडरसनने चौकार, षटकारांच्या मदतीने धमाका केला. वेगवान गोलंदाज मोर्ने मोर्कलने १८ धावांत विकेट, तर शकीबने ४८ धावांत गडी बाद केला. वेगवान गोलंदाज उमेश यादव, सुनील नरेन खास कामगिरी करू शकले नाहीत.

आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी बॉलीवूडचा बादशहा आणि केकेआरचा सहमालक शाहरुख खान स्टेडियमवर उपस्थित होता. याशिवाय मुंबई इंडियन्सची मालकीन नीता अंबानी, मुंबईचा आयकॉन सचिन तेंडुलकर, मेंटर अनिल कुंबळेही सामन्याच्या वेळी उपस्थित होते.

केकेआरचा "सूर्य' तळपला
धावांचापाठलाग करताना केकेआरचा कर्णधार गौतम गंभीर १४.२ षटकांत १२१ धावांच्या स्कोअरवर बाद झाला. गंभीर बाद झाल्यानंतर केकेआरची टीम दबावात आली. मात्र, युवा खेळाडू सूर्यकुमार यादवने अवघ्या २० चेंडूंत नाबाद ४६ धावा ठोकून सामना फिरवला. सूर्यकुमारने या खेळीत चौकार आणि षटकार खेचले. सूर्यकुमारने युसूफ पठाणसोबत चौथ्या विकेटसाठी ४.१ षटकांत ४९ धावांची अभेद्य भागीदारी करून विजय खेचून आणला. युसूफ पठाणने १२ चेंडूंत चौकार, षटकारासह नाबाद १४ धावा ठोकल्या.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, सामन्यातील काही खास फोटो...