आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MIvsRCB: मुंबई इंडियन्सला गवसला विजय, हरभजन ठरला सामनावीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेंगलुरु - चार सामन्यांत सलग पराभवाचा सामना केल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाला विजय गवसला आहे. तीन बळी घेणारा हरभजन सिंग सामनावीर ठरला.
 
प्रथम फलंदाजी करणार्‍या मुंबईनेसिमन्स आणि उनमुक्त चंद यांची अर्धशतके आणि रोहित शर्माची तडाखेबाज 42 धावांच्या खेळीच्या जोरावर 209 धावा केल्या. प्रत्युत्तरात बेंगळुरुची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचे पाच फलंदाज लवकर बाद झाले. मात्र डिव्हीलियर्सने 11 चेंडूत  41 धावा करत विजय खेचून आणण्याचा प्रयत्न केला. पण फटकेबाजी करताना तो बाद झाला. त्यानंतर वीजने पुन्हा एकदा आशा जागवल्या. मात्र मुंबईने यावेळी काहीही चूक केली नाही.
 

बेंगलुरुने नाणे फेक जिंकले 
रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुने मुंबई इंडियन्सविरोधात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्सने त्यांच्या संघात चार मुख्य बदल केले आहेत. डॅरेन सॅमी, सीन एबॉट, हर्षल पटेल आणि मंदीप सिंह यांना बाहेर बसवले आहे, तर त्यांच्या जागी इकबाल अब्दुल्लाह, डेविड विसी, रिली रोसोउ आणि मानविंदर बिसला यांना संघात घेतले आहे. मुंबई इंडियन्सनेही त्यांच्या संघात चार बदल केले असून मिचेल मॅक्लिंघन, उनमुक्त चंद, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या यांना स्थान देण्यात आले आहे. रॉयल चॅलेंजर्सने आयपीएलच्या सध्या सुरू असलेल्या सीझनमध्ये आता पर्यंत दोन सामने खेळले आहेत, ज्यातील एक सामन्यात त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे हा संघ दो अंकांसोबत यादीत सातव्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स अजूनही विजयाच्या प्रतिक्षेत आहे. मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या चारीही सामन्यात पराभवच पाहिला आहे. 
 

टीम :
> रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु : विराट कोहली (कप्तान), एबी डिविलियर्स, क्रिस गेल, दिनेश कार्तिक, इकबाल अब्दुल्लाह, डेविड विसी, रिली रोसोउ, युजवेंद्र चहल, अबु नेचिम, मानविंदर बिसला, वरूण एरॉन 

> मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कप्तान), लेंडिल सिमंस, अंबाती रायुडू, पार्थिव पटेल, मिचेल मैक्लिंघन, कीरन पोलार्ड, हरभजन सिंह, लसिथ मलिंगा, उनमुक्त चंद, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या
 
बातम्या आणखी आहेत...