आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL AUCTION: युवराजला खरेदी करुन माल्या झाले दिवाळखोर, उरले फक्त 1.8 कोटी रुपये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु - येथील आयटीसी गार्डनिया हॉटेलमध्ये सातव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-20 (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेसाठी बोली सुरु झाली आहे. पहिल्या फेरीत युवराजसिंह सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला रॉयल चॅलेंर्जस बंगळुरूने 14 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. युवी आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडूही ठरला आहे. त्याच्यावर लावलेल्या बोलीने 2011 मध्ये गौतम गंभीरवर लावण्यात आलेल्या 11.4 कोटींच्या बोलीचा विक्रम मोडला आहे. गंभीरला कोलकाता नाइट रायडर्सने 2.4 मिलियन डॉलरमध्ये खरेदी केले होते.

युवराजनेच नाहीत तर, दिनेश कार्तिकने देखील गंभीरला मागे टाकले आहे. कार्तिकची बोली 12.5 कोटी लागली आहे.
उद्या 13 फेब्रुवारी रोजी अनकॅप्ड खेळाडूंचा लिलाव होणार आहे.
माल्या झाले दिवाळखोर
आजच्या लिलावानंतर सर्वात कमी पैसे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे राहिले आहेत. बंगळुरुने तीन खेळाडूंना कायम ठेवले होते. लिलावासाठी माल्या 30.5 कोटी रुपयांसह आले होते. मुथय्या मुरलीधरन, पार्थीव पटेल, एल्बी मॉर्केल, रवी रामपॉल, अशोक दिंडा, मिचेल स्टार्क, निक मॅडिन्सन, वरुण आरोन आणि युवराजसिंह यांना खरेदी केल्यानतंर त्यांच्या कडे आता 1.8 कोटी रुपये शिल्लक राहिले आहे. त्यांच्या संघासाठी अजून चार खेळाडूंची गरज आहे आणि आता बजेट फक्त 1.8 कोटी शिल्लक आहे.
शेवटच्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या मॅट हेनरीलाच फक्त खरेदीदार मिळाला. त्याला चेन्नई सुपर किंग्जने 30 लाख या बेस प्राइजवर खरेदी केले.
कोणा जवळ किती रुपये राहिले शिल्लक आणि किती आहे खेळाडूंचा कोटा ?
कोलकाता - 6 खेळाडू - 9.00 कोटी रुपये
दिल्ली - 3 खेळाडू - 8.6 कोटी रुपये
पंजाब - 4 खेळाडू -14.20 कोटी रुपये
चेन्नई - 3 खेळाडू - 2.9 करोड़ रु.
मुंबई - 6 खेळाडू - 5.15 कोटी रुपये
बंगळुरु - 4 खेळाडू - 1.8 कोटी रुपये
हैदराबाद - 3 खेळाडू - 8.4 कोटी रुपये
राजस्थान - 5 खेळाडू - 12.10 कोटी रुपये
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, कोणाला मिळाली किती किंमत