आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE IPL 7 : Chennai Super Kings Vs Kings Xi Punjab Live Match Latest News In Marathi

IPL-7 पंजाबला \'तिकीट टू बंगळुरु\', चेन्‍नईवर 24 धावांनी मात करुन फायनलमध्‍ये प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - किंग्‍ज इलेव्‍हन पंजाब विरुध्‍द चेन्‍नई सुपर किंग्‍ज यांच्‍यामध्‍ये झालेल्‍या तुल्‍यबळ लढतीत पंजाबने चेन्‍नईला 24 धावांनी मात दिली. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना वीरेंद्र सेहवागच्‍या 122 धावांच्‍या झुंजार खेळीने 20 ओव्‍हरअखेर 6 बाद 226 धावा केल्‍या होत्‍या.
प्रतित्‍युत्‍तरादाखल चेन्‍नईने 7 खेळाडूंच्‍या मोबदल्‍यात 20 ओव्‍हरअखेर 202 धावा केल्‍या. सुरेश्‍ा रैनाची 25 चेंडूमध्‍ये 87 धावांची आतिषी पारी व्‍यर्थ ठरली.

चेन्‍नईची खराब सुरुवात
प्रतित्‍युत्‍तरादाखल चेन्‍नईची सुरुवात अत्‍यंत बिकट झाली आहे. पहिल्‍या षटकाच्‍या दुस-याच चेंडूत सलामीवीर फॉफ डू प्लेसिस झेलबाद झाला आहे.

वीरेंद्र सेहवागचे झुंजार शतक
आयपीलच्‍या सातव्‍या पर्वामधील दुसरे शतक वीरेंद्र सेहवागने लगावले. सेहवागने सुरुवातीपासुन चेन्‍नई गोलंदाजीवर आक्रमण करताना 58 चेंडूमध्‍ये 12 चौकार आणि 4 षटकाराच्‍या सहाय्याने 122 धावा केल्‍या.
उभय संघ
चेन्नई सुपर किंग्स : महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), ड्वेन स्मिथ, फॉफ डू प्लेसिस, सुरेश रैना, ब्रेंडन मॅक्कुलम, रविंद्र जडेजा, डेविड हसी, आशीष नेहरा, मोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, ईश्वर पांडे
किंग्स इलेवन पंजाब : जॉर्ज बॅली (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, मनन वोहरा, रिद्धिमान साहा, ग्लेन मॅक्सवेल, डेविड मिलर, अक्षर पटेल, मिचेल जॉनसन, संदीप शर्मा, परविंदर अवाना, करनवीर सिंह
सामन्‍यादरम्‍यानची छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...