आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE IPL 7 Cricket Match, Rajasthan Royels Vs Haydreabad Live Scorecard In Marathi

IPL-7 : राजस्थानकडून हैदराबाद पराभूत; अजिंक्य रहाणे सामनावीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबुधाबी - राजस्थान रॉयल्सने आयपीएल-7 मध्ये शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादला 4 गड्यांनी पराभूत केले. सामनावीर अजिंक्य रहाणे (59) आणि स्टुअर्ट बिन्नीच्या नाबाद 48 धावांच्या बळावर राजस्थान रॉयल्सने सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने 6 गडी गमावून 133 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने 19.3 षटकांत लक्ष्य गाठले.

तत्पूर्वी सनरायझर्सचा सलामीवीर अ‍ॅरोन फिंच केवळ दोन धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार शिखर धवन (38 धावा, 3 चौकार, 1 षटकार) आणि डेव्हिड वॉर्नर (32 धावा, 1 चौकार) यांनी 75 धावांची भागीदारी रचली. लोकेशने 20, वेणुगोपाल रावने 16 धावांचे योगदान दिले.