आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE IPL 7: Delhi Daredevils Vs Royal Challengers Cricket, Latest News In Marathi

IPL-7: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची दिल्ली डेअरडेव्हिल्सवर आठ गड्यांनी मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबुधाबी - कर्णधार विराट कोहली (49) आणि युवराजसिंग (52) यांच्या अभेद्य 84 धावांच्या भागीदारीच्या बळावर रॉयल चॅलेंर्जस बंगळुरूने सातव्या सत्राच्या आयपीएलला धडाकेबाज विजयाने सुरुवात केली. बंगळुरूने गुरुवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 8 गड्यांनी मात केली. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 4 गडी गमावून 145 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात बंगळुरूने 16.4 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. कोहलीने दुसर्‍या गड्यासाठी पार्थिव पटेलसोबत (37) 56 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. वाय. एस. चाहल (1/18) सामनावीर ठरला.

डुमिनी-टेलरची भागीदारी व्यर्थ : दिल्लीचा दिनेश कार्तिक (0), मयंक (6) व एम. तिवारी (1) हे स्वस्तात बाद झाले. त्यानंतर जेपी डुमिनी आणि रॉस टेलरने पाचव्या विकेटसाठी केलेली 110 धावांची अभेद्य भागीदारी व्यर्थ ठरली.

क्रिस गेलला विश्रांती
गत सत्रात पुणे वॉरियर्सविरुद्ध नाबाद 175 (13 चौकार, 17 षटकार) धावा काढणार्‍या क्रिस गेलला रॉयल चॅलेंर्जस बंगळुरूच्या प्लेंइग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही. कर्णधार विराट कोहलीने याचे कोणतेही कारण दिले नाही. मात्र, अनफिट असल्याची गेलला विश्रांती दिल्याची चर्चा होती.