आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE IPL 7 : KXIP Vs CSK Live Scorecard In Marathi

IPL-7 : किंग्जच्या लढतीत पंजाबची सरशी; मॅक्सवेलची चमकदार कामगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबुधाबी - जॉर्ज बेलीच्या नेतृत्वाखाली किंग्ज इलेव्हन पंजाबने शुक्रवारी आयपीएल-7 मध्ये दोन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जचा सहा गड्यांनी पराभव केला. ग्लेन मॅक्सवेल (95) आणि डेव्हिड मिलर (नाबाद 54) यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबने सामना जिंकला. या सामन्यात कर्णधार धोनीने अवलंबलेले डावपेच सपशेल अपयशी ठरले.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपरकिंग्जने चार बाद 205 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात किंग्ज इलेव्हन पंजाबने 18.5 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. झंझावाती फलंदाजी करणारा ग्लेन मॅक्सवेल सामनावीरचा मानकरी ठरला.

धावांचा पाठलाग करणार्‍या पंजाबला चेतेश्वर पुजारा (13) आणि वीरेंद्र सेहवाग (19) यांनी चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी संघाला 31 धावांच्या भागीदारीची सलामी दिली. दरम्यान, अश्विन व नेहराने या दोघांना तंबूत पाठवले. त्यानंतर आलेल्या मॅक्सवेलने संघाचा डाव सावरला. त्याने 43 चेंडूंचा सामना करताना 15 चौकार आणि दोन षटकारांसह 95 धावा काढल्या. डॅवेन स्मिथने मॅक्सवेलला त्रिफळाचीत केले. त्यानंतर जॉर्ज बेली (17) आणि मिलरने अभेद्य 39 धावांची भागीदारी करून पंजाबने सामना जिंकला.

स्मिथ-मॅक्लुमची भागीदारी व्यर्थ
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणार्‍या चेन्नई सुपरकिंग्जला ड्वेन स्मिथ (66) आणि ब्रेडन मॅक्लुम (67) यांनी 123 धावांच्या भागीदारीची दिलेली सलामी व्यर्थ ठरली. सुरेश रैनाने 24, धोनी 26 आणि ब्राव्होने नाबाद 8 धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत एल. बालाजीने दोन गडी बाद केले.


पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा सामन्याची फोटोज्....