आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE IPL 7 : Punjab Vs Chennai Match, Divya Marathi

IPL-7 : चेन्नई सुपरकिंग्ज चारी मुंड्या चीत, ग्लेन मॅक्सवेलची 90 धावांची वादळी फलंदाजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कटक - सामनावीर ग्लेन मॅक्सवेलच्या (90) झंझावाती फलंदाजीच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबने बुधवारी दोन वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जचा 44 धावांनी पराभव केला. याशिवाय पंजाबने आयपीएलमध्ये विजयाचा षटकार ठोकला. या विजयासह पंजाबने गुणतालिकेत 12 गुणांसह अव्वलस्थानी धडक मारली.

प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने सत्रातील सर्वाधिक 231 धावसंख्या उभी केली. प्रत्युत्तरात कर्णधार धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जने सहा गड्यांच्या मोबदल्यात 187 धावांत गाशा गुंडाळला. चेन्नई सुपरकिंग्जचा स्पर्धेतील हा दुसरा पराभव ठरला. धावांचा पाठलाग करणार्‍या चेन्नईची सुरुवात निराशाजनक झाली. स्मिथ (4) झटपट बाद झाला.

तत्पूर्वी, पंजाबला वीरेंद्र सेहवाग (30) व मनदीपसिंग (3) या जोडीने 33 धावांची भागीदारी केली. दरम्यान, मोहित शर्माने मनदीपला झेलबाद केले. त्यापाठोपाठ सेहवागही (30) तंबूत परतला. त्यानंतर जॉन्सन (11) व जॉर्ज बेलीने पाचव्या गड्यासाठी 49 धावांची अभेद्य भागीदारी केली. बेलीने 13 चेंडूंत नाबाद 40 धावा काढल्या. मोहित शर्माने दोन, हिल्फेनहास आणि स्मिथने प्रत्येकी एक विकेट घेतली.

संक्षिप्त धावफलक : पंजाब : 4 बाद 231, चेन्नई : 6 बाद 187.

चौथ्यांदा शतक हुकले
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ग्लेन मॅक्सवेलचे आयपीएल-7 मध्ये चौथ्यांदा शतक हुकले. त्याला चार वेळा अर्धशतकावर समाधान मानावे लागले. बुधवारी चेन्नईविरुद्ध सामन्यात 90 धावा काढल्या. तत्पूर्वी 22 एप्रिलला हैदराबादविरुद्ध 95 धावा काढल्या. राजस्थान्विरुद्ध 20 एप्रिल रोजी 89 धावा काढल्या होत्या. त्यानंतर 18 एप्रिलला चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध 95 धावांची खेळी केली होती.

डुप्लेसिस- धोनीची भागीदारी व्यर्थ
चेन्नईकडून डुप्लेसिस व धोनीने पाचव्या गड्यासाठी केलेली 61 धावांची भागीदारी व्यर्थ ठरली. धोनीने 23 धावांचे योगदान दिले. डुप्लेसिसने 25 चेंडूंत 52 धावा काढल्या. तत्पूर्वी, सुरेश रैना आणि मॅक्लुमने दुसर्‍या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. यात रैनाने 27 चेंडूंत 35 धावा काढल्या. तसेच मॅक्लुमने 29 चेंडूंचा सामना करताना 33 धावांची खेळी केल.
मॅक्सवेल-मिलरची शतकी भागीदारी
पंजाबचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड मिलरने चेन्नईची गोलंदाजी फोडून काढली. यासह या दोघांनी तिसर्‍या गड्यासाठी 135 धावांची भागीदारी केली. यात मिलरने 32 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकाराच्या साहाय्यानो 47 धावा काढल्या. तसेच ग्लेन मॅक्सवेलने 38 चेंडूंत सहा चौकार आणि आठ षटकारांच्या बळावर 90 धावा काढल्या. यासह त्याने यंदाच्या सत्रातील आयपीएलमध्ये चौथे अर्धशतक साजरे केले. दरम्यान, स्मिथने मिलरला त्रिफळाचीत केले.