आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE IPL 7 Punjab Vs Delhi Match Score News In Marathi

पंजाबकडून दिल्ली सर, प्ले ऑफमध्ये कोलकाताशी सामना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली - किंग्ज इलेव्हन पंजाबने रविवारी आयपीएल-7 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सात गड्यांनी पराभव केला. सामनावीर मनन वोहरा (47) आणि डेव्हिड मिलर (नाबाद 47) यांच्या 96 धावांच्या भागीदारीच्या बळावर पंजाबने 13.5 षटकांत सामना जिंकला. पंजाबचा हा 11 वा विजय ठरला. दुसरीकडे दिल्लीला 12 व्या पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 18.1 षटकांत 115 धावा काढल्या. पंजाबच्या किंग्जने आवाक्यातले हे लक्ष्य तीन गड्यांच्या मोबदल्यात गाठले.