आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE IPL 7 : Punjab Vs Mumbai Match Latest News In Marathi

IPL-7 : मुंबई इंडियन्स विजयी ट्रॅकवर, इंडियन्सची किंग्ज इलेव्हन पंजाबवर 5 विकेटने मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केरॉन पोलार्ड (12 चेंडूत 28 धावा) आणि आदित्य तारे (6 चेंडूत 16 धावा) यांच्या 15 चेंडूतील 44 धावांच्या अभेद्य भागीदारीने मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएल हंगामातील विजयाचा दुष्काळ संपवून दिला. सलग पाच पराभवानंतर मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर 5 चेंडू व 5 विकेट राखून मात केली आणि आयपीएल-सातमधील आपल्या पहिल्यावहिल्या विजयाची नोंद केली. मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या विजयाची तर पंजाबने मुंबईच्या पराभवाची मालिका या सामन्यात खंडीत केली.

रोहित शर्मा (34 चेंडूत 39 धावा) व कोरी अ‍ॅँडरसन (25 चेंडूंत 35 धावा) यांची अर्धशतकी भागीदारी संपुष्टात आली आणि विजयाच्या समीप आलेला मुंबई इंडियन्सचा संघ विजयाच्या लक्ष्यापासून दूर फेकला जाऊ लागला.

केरॉन पोलार्डला सुरुवात वेगात करता आली नाही. त्या वेळी आदित्य तारे या मुंबईकर फलंदाजाने मुंबई आणि पोलार्डला हुरूप दिला. बालाजीच्या गोलंदाजीवर ड्राइव्हचा चौकार आणि पुलचा षटकार मारून आदित्य तारेने पोलार्डला आत्मविश्वास दिला. नंतर पोलार्डही लयीत आला.

पुढे वाचा