आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE IPL 8, 15th Match: Rajasthan Royals V Chennai Super Kings At Ahmedabad

RRvsCSK: राजस्थानचा चेन्नईवर 8 गडी राखून विजय, रहाणे-वाटसन ठरले विजयाचे शिल्पकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - आयपीएल-8 च्या 15व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने दिलेल्या 157 धावांचा पाठलाग करत राजस्थानने दोन गडी बाद 157 धावा काढून सामना स्वतःच्या नावावर केला. चेन्नई सुपर किंग्सचा चार सामन्यातील हा पहिला पराभव आहे, तर राजस्थान रॉयल्सचा हा सलग पाचवा विजय आहे. राजस्थानला जिंकवण्यासाठी अजिंक्य रहाणेने सर्वाधिक म्हणजेच 76 धावा काढल्या, तर कर्णधार शेन वॉट्सननेही 73 धावा केल्या.
इवेन ब्राओचे धमाकेदार अर्धशतक, राजस्थानला दिले 157 धावांचे आव्हान
संघाची वाईट सुरूवात झाल्यानंतर ड्वेन ब्रावो (62*) आणि ड्वेन स्मिथ (40) यांनी चांगली खेळी करत चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सला 157 धावांचे आव्हान दिले. कर्णधार महेंद्रसिंह धोनी 31 धावाकाढून नाबाद राहिला. राजस्थानकडून खेळत असलेला अंकित शर्मा, क्रिस मोरिस, प्रवीण तांबे आणि जेम्स फल्कनर यांनी चेन्नईचा एक एक गडी बाद केला.
39 वर झाले 3 गडी बाद, मॅक्कुलम-रैना-प्लेसिस बाद
राजस्थान रॉयल्सविरोधात चेन्नई सुपर किंग्सची सुरूवात खुपच वाईट झाली. 39 धावांवर संघाचे 3 बलाढ्य फलंदाज पव्हेलियनमध्ये परतले होते. चेन्नईला पहिला झटका ब्रेंडन मॅक्कूलमच्या रुपाने बसला. मॅक्कूलम 12 धावा काढून तांबेच्या गोलंदाजीवर जेम्स फल्कनरच्या हातात झेल देत बाद झाले. यानंतर सुरेश रैनाचा झेल (4 धावा) क्रिस मोरिसच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने धरला. या दोन्ही धक्क्यांमधून चेन्नई सावरतो ना सावरतो तोच अंकित शर्माने षटकार ठोकण्याच्या नादात प्लेसिस क्रिस मोरीसच्या हातात झेल दिला.

चेन्नईने नाणेफेक जिंकले
चेन्नई सुपरकिंग्सने राजस्थान रॉयल्स विरोधात नाणेफेक जिंकत पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल्स आतापर्यंत आयपीएल-8 मध्ये त्यांचे चारीही सामने जिंकून सारणीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर लगातार तीन सामने जिंकून चेन्नई सुपर किंग्स हा सामना जिंकून रॉयल्सला खाली ओढण्याच्या तयारीत आहे. सुपर किंग्सने शुक्रवारी वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियंसला जशा प्रकारे हरवले ते राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांसाठी एक चेतावणी होती.

प्लेइंग इलेवन :
> राजस्थान रॉयल्स : अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन, स्टीवन स्मिथ (कप्तान), करुण नायर, स्टुअर्ट बिन्नी, दीपक हूडा, जेम्स फल्कनर, क्रिस मोरिस, टिम साउदी, धवल कुलकर्णी, प्रवीण तांबे

> चेन्नई सुपर किंग्स : ब्रेंडन मॅक्कुलम, ड्वेन स्मिथ, सुरेश रैना, फॉफ डु प्लेसिस, ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी (कप्तान/विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, मोहित शर्मा, ईश्वर पांडे, आशीष नेहरा