आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE IPL 8, 28th Match: Chennai Super Kings V Kolkata Knight Riders At Chennai

CSK vs KKR : रोमांचक सामन्यात चेन्नई अवघ्या दोन धावांनी विजयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - एम.ए. चिदंबरम स्टेडियवर झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या आठव्या पर्वातील 28 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाइटराइडर्सविरूद्धच्या रोमांचक सामन्यात दोन धावांनी विजय मिळविला आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 134 धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात केकेआरने नऊ गडी गमावत 132 धावा केल्या. अवघ्या दोन धावांनी चेन्नईचा विजय झाला.
चेन्नईला पहिला झटका ब्रेंडन मॅक्कुलमच्या रूपाने लागला. मॅक्कुलम 19 रनांवर असताना पीयूष चावलाने त्यास आउट केले. तर ड्वेन स्मिथ 25 रनांवर रन आउट झाला. सुरेश रैनाने 17 रन बनवल त्यास आंद्रे रसेलने बॉलिंगवर रॉबिन उथप्पाने कॅच आउट केले.
कोलकाताने जिंकला टॉस
कोलकाता नाइटराइडर्सने टॉस जिंकून चेन्नई सुपर किंग्सला पहिले बॅटिंग करण्यास आमंत्रित केले. नाइटराइडर्सने आजच्या मॅचसाठी टीममध्ये तीन बदल केले असून मोर्ने मोर्कल, सुनील नारायण आणि जोहान बोथा यांच्या ऐवजी पॅट कमिस, ब्रॅड हॉज, रॉयन टेन डोश्टे यांना संधी देण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्सने आत्तापर्यंत खेळलेल्या 6 मॅचेसपैकी 5 मॅचेसमध्ये विजय मिळवत अंकतालिकेत 10 अंकांसोबत दूस-या स्थानावर आहे. तर नाइटराइडर्स सात अंकांसोबत तिस-या स्थानी आहे.

प्लेइंग इलेवन :
> चेन्नई सुपर किंग्स : महेंद्र सिंह धोनी, ब्रेंडन मॅक्कुलम, ड्वेन स्मिथ, सुरेश रैना, फॉफ डु प्लेसिस, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, रविचंद्रन अश्विन, मोहित शर्मा, ईश्वर पांडे, आशीष नेहरा।
> कोलकाता नाइटराइडर्स : गौतम गंभीर (कॅप्टन ), रॉबिन उथप्पा (विकेटकीपर), मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, यूसुफ पठान, आंद्रे रसेल, रॉयन टेन डोश्टे, पीयूष चावला, उमेश यादव, पैट कमिस, ब्रैड हॉज।