आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE IPL 8, 29th Match: Royal Challengers Bangalore V Rajasthan Royals At Bangalore

IPL-8 RR vs RCB : बंगळूरुला तिसरा झटका, मंदीप 27 रनावर आउट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळूरु - राजस्थान रॉयल्स विरूद्ध पहिले बॅटिंग करत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने 12 ओवरमध्ये 3 विकेटच्या बदल्यात 103 रन बनवले आहेत. दिनेश कार्तिक आणि एबी डिविलियर्स सध्या क्रीजवर आहेत. चॅलेंजर्सचे टॉप ऑर्डर बॅट्समन 19 रनांवर आउट झाले. क्रिस गेलला 10 रनांवर टिम साउदीने आउट केले तर विराट कोहली देखील टिम साउदीचा शिकार बनला. विराट केवळ एक रन काढून आउट झाला.
आजच्या सामन्यासाठी रॉयल चॅलेंजर्सने संघामध्ये एक बदल केला आहे. इकबाल अब्दुल्लाच्या जागी युजवेंद्र चहल यास पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे. राजस्थानच्या संघामध्येदेखील एक बदल झाला असून क्रिस मोरिस ऐवजी टिम साउदीला संधी देण्यात आली आहे. रॉयल्सने आत्तापर्यंतच्या आठ सामन्यांमध्ये 11 गुण मिळवत अंकतालिकेत दूसरे स्थान पटकावले आहे. तर रॉयल चॅलेंजर्सने सहा सामन्यांमध्ये 11 गुण मिळवत अंकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
प्लेइंग इलेवन :
> रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु : विराट कोहली (कर्णधार ), क्रिस गेल, एबी डिविलियर्स, मंदीप सिंह, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सरफराज खान, डेविड वेस, मिचेल स्टार्क, हर्षल पटेल, वरुण आरोन, युजवेंद्र चहल।
> राजस्थान रॉयल्स : अजिंक्य रहाणे, शेन वाटसन (कर्णधार), संजू सॅमसन, स्टीवन स्मिथ, करुण नायर, स्टुअर्ट बिन्नी, दीपक हुड्डा, जेम्स फल्कनर, टिम साउदी, अंकित शर्मा, प्रवीण तांबे।