नवी दिल्ली - आयपीएल-8 च्या 31व्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने विजयासाठी दिलेल्या 118 धावांचा पाठलाग करताना दिल्ली डेअरडेव्हिल्सने 13.5 ओव्हरमध्ये एक विकेट गमावत 119 धावा काढून विजय नोंदवला.
दिल्लीची दमदार सुरुवात
118 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात दमदार झाली. सलामी फलंदाज श्रेयस अय्यर आणि मयंक अग्रवाल यांनी 12.3 ओव्हर्समध्ये जोरदार फलंदाजी करत 106 धावा कडून दिल्लीचा विजय निश्चित केला. श्रेयस अय्यरने 40 बॉलमध्ये 4 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 54 धावा काढल्या. श्रेयस अय्यरला शार्दुल ठाकूरने बाद केले. मयंक अग्रवालने 40 बॉलमध्ये 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 52 धावा काढल्या.
पंजाबने काढल्या 118 धावा
नाथन कुल्टर (20/4) च्या घातक बॉलिंगच्या जोरावर दिल्लीने पंजाबला केवळ 118 धावसंख्येवर रोखले. नानेफेल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबची सुरुवात खराब झाली. पंजाबचे चार सलामी फलंदाज केवळ दहा धावा काढून तंबूत परतले. एक क्षण असे वाटत होते की, पंजाब 50 धावाच काढू शकेल परंतु डेव्हिड मिलर (42), अक्षर पटेल (22) आणि कर्णधार जॉर्ज बेलीच्या 18 धावांच्या खेळीने पंजाबचा संघ 118 धावांपर्यंत पोहोचला. आयपीएल-8 मध्ये
आपला पहिला सामना खेळताना झहीर खानने उत्कृष्ट गोलंदाजी करत 4 ओव्हरमध्ये 17 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. जेपी डुमिनी आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
झहीरची दमदार बॉलिंग
सर्वात पहिले वीरेंद्र सेहवाग (01) सामन्यातील झहीरच्या पहिल्याच बॉलवर बाद झाला. त्यानंतर पुढील ओव्हरमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार जेपी डुमिनीने शॉन मार्श (5) ला बाद केले. सामन्यातील तिसऱ्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर झहीरने नमन व्होरा (01)ला बाद केले. पुढील ओव्हरमध्ये कुल्टरने वृद्धिमान साहा (03)ला बाद केले. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून अक्षर पटेल (22) आणि डेव्हिड मिलर (42) यांनी सातव्या विकेटसाठी 57 धावांची भागेदारी केली.
सामन्यादरम्यानची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...