मुंबई - वानखेडे स्टेडीयमवर आयपीएल-8 च्या 32 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत 187 धावांचा डोंगर उभा केेला. त्याच्या प्रत्युत्तरात राजस्थानने निर्धारीत 20 ओव्हरमध्ये सात विकेट गमावत 179 धावा केल्या आहेत.
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर फलंदाजीसाठी निमंत्रित केले होते. मुंबई इंडियन्सने पाच विकेट गमावत निर्धारित 20 ओव्हरमध्ये अंबाती रायडूच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 187 धावा केल्या. त्याला पोलार्डने चांगली साथ दिली. पार्थिव पटेल 23 धावा काढून धवल कुलकर्णीच्या बॉलवर बाद झाला. राजस्थान रॉयल्सला आता 120 चेंडूंमध्ये 188 धावा पूर्ण करण्याचा आव्हान आहे.
पुन्हा एकदा वानखेडेवर विजयी पताका फडकवण्यासाठी यजमान मुंबई इंडियन्स संघ सज्ज झाला आहे. गतवेळी याच मैदानावर मुंबई संघाने शानदार विजयाची नोंद केली होती. आता याच विजयाला पुन्हा एकदा उजाळा देण्याची आशा मुंबई संघाकडून आहे.
दुसरीकडे शानदार विजयासह स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्यासाठी राजस्थानचा संघ उत्सुक आहे. वॉटसनच्या या टीमला दोन सामन्यांत पावसाचा मोठा फटका बसला आहे. बंगळुरूविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि या संघाला एका गुणावर समाधान मानावे लागले. त्यामुळे आता सामना जिंकून विजयी ट्रॅकवर येण्याचा राजस्थान रॉयल्स संघाचा प्रयत्न असेल.
रोहित, मलिंगावर मदार
यजमान मुंबई संघाला घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात विजयाची आशा आहे. या संघाच्या विजयाची मदार कर्णधार रोहित शर्मासह पोलार्ड, पार्थिव पटेल, हरभजन आणि मलिंगावर आहे. गोलंदाजीत सध्या हरभजन आणि मलिंगा समाधानकारक कामगिरी करत आहेत. मलिंगाने आतापर्यंत सात सामन्यांत 7.96 च्या सरासरीने 10 विकेट घेतल्या आहेत. तसेच हरभजनच्या नावे एकूण आठ विकेट आहेत. त्यामुळे मलिंगा हरभजनसमोर राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असेल. हे दोघेही यशस्वी ठरतील, असे चित्र आहे.
वॉटसन, स्मिथकडून खेळीची आशा
राजस्थान रॉयल्स संघाला कर्णधार शेन वॉटसनसह रहाणे, स्मिथकडून अजिंक्य खेळीची आशा आहे. या चौघांवर टीमच्या विजयाची मदार असेल. स्मिथ जबरदस्त फॉर्मात आहे. मुंबईविरुद्ध सामन्यात चमत्कारी फलंदाजी करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.