बंगळूरु - आयपीएलच्या 8 व्या पर्वातील 33 व्या सामन्यामध्ये कोलकाता नाइटरायडर्सने दिलेले 112 धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या चॅलेंजर्सने 9.4 ओवरमध्ये तीन गड्यांच्या बदल्यात 115 रन बनवत केकेआरवर विजय मिळवला आहे.
केकेआरने बनवले 111 रन
आंद्रे रसेल (45) च्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर कोलकाता नाइटरायडर्सने रॉयल चॅलेंजर्ससमोर 10 ओव्हरमध्ये विजयासाठी 112 धावांचे लक्ष ठेवले आहे. पावसाच्या व्यत्ययामूळे सामना सुरू होण्यास अडीच तास उशीर झाल्याने सामना 10-10 ओव्हर्सचा करण्यात आला. टॉस हारून पहिले बॉलिंग करत नाइटरायडर्सने निर्धारित 10 ओव्हर्समध्ये चार विकेटच्या बदल्यात 111 रन बनवले. सलामीला आलेल्या रॉबिन उथप्पा (23) आणि कर्णधार गैतम गंभीर (12) यांनी पहिल्या विकेटसाठी 3.5 ओव्हर्समध्ये 33 रन बनवले. गंभीरला डेविड वीजने प्वाइंटवर मंदीप सिंहच्या हातात कॅच देण्यास भाग पाडले. यानंतर मैदानात उतरलेल्या आंद्र रसेलने नाइट राइडर्सच्या संघाला गती देण्याचा प्रयत्न केला. रसेलने 17 चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकार ठोकले. रसेलने दूस-या विकेटसाठी रॉबिन उथप्पासोबत 18 चेंडूत 38 धावांची भागीदारी केली.
टीम (संभावित) :
> रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू : क्रिस गेल,
विराट कोहली (कॅप्टन), एबी डिविलियर्स, मंदीप सिंह, दिनेश कार्तिक, सरफराज खान, डेविड वेस, मिचेल स्टार्क, हर्षल पटेल, वरुण आरोन, यजुवेंद्र चहल।
> कोलकाता नाइटरायडर्स : रॉबिन उथप्पा,
गौतम गंभीर (कॅप्टन), मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, युसूफ पठान, रेयान टेन डोश्टे, आंद्रे रसेल, पीयूष चावला, पॅट कमिंस, ब्रॅड हॉज, उमेश यादव।