चेन्नई- सुपर किंग्जने ठेवलेल्या 149 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला किंग्जच्या खेळाडूंनी 124 धावांवर रोखत चॅलेंजर्सवर 24 धावांनी विजय मिळवला आहे. चॅलेंजर्सने 19.4 षटकांत 10 विकेटच्या बदल्यात केवळ 124 धावा बनवल्या.
तत्पूर्वी- चेन्नईने समोर विजयासाठी 149 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत निर्धारित 20 षटकांत 148 धावा केल्या.
चेन्नईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर स्मिथला धावांचे खातेही उघडता आले नाही. सुरेश रैनाने 46 चेंडूत शानदार अर्धशतक (52) ठोकले. नंतर कर्णधार धोनी (29) सोडला एकाही फलंदाजाला
आपल्या संघासाठी विशेष असे योगदान देता आल नाही. बंगळुरुचा गोलंदाज स्टार्कने दोन विकेट घेतले.
चेन्नईचा स्कोरबोर्ड
फलंदाज |
बाद |
धावा |
चेंडू |
4 |
6 |
ड्वेन स्मिथ |
बो. स्टार्क |
0 |
6 |
0 |
0 |
मॅक्कुलम |
कॅ. इकबाल बो. वेस |
20 |
15 |
4 |
0 |
सुरेश रैना |
LBW बो. हर्षल |
52 |
46 |
5 |
1 |
प्लेसिस |
बो. हर्षल |
24 |
20 |
0 |
1 |
धोनी |
कॅ. स्टार्क बो. वेस |
29 |
18 |
2 |
2 |
जडेजा |
कॅ. कोहली बो. चहल |
3 |
4 |
0 |
0 |
पवन |
नॉट आउट |
7 |
2 |
0 |
1 |
ड्वेन ब्रावो |
कॅ. वेस बो. ब्रावो |
2 |
3 |
0 |
0 |
डेव्हिड वेसच्या चेंडूवर इकबालने ब्रॅंडन मॅक्कुलमचा (20) झेल घेतला. प्लेसिस 24 धावा करून हर्षल पटेलच्या चेंडूवर बोल्ड झाला. सुरेश रैनाने शानदार अर्धशतक झळकावले रैनाला 50 धावांवर हर्षल पटेलने पायचित केले.
'आयपीएल-8' मधील 37व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपल्या संघात दोन बदल केले आहे. ते म्हणजे क्रिस गेल मैदानावर खेळताना दिसणार नाही. त्याच्याऐवजी मेडिसन आणि वरुण आरोनच्या ऐवजी इकबाल अब्दुल्लाहला संधी देण्यात आली आहे.
चेन्नई सुपर किंग्ज नऊ लढतीत 12 गुण प्राप्त केले आहे. आयपीएल-8च्या गुणतालिकेत चेन्नई दुसर्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे बंगळुरुने आठ लढतीत नऊ गुण प्राप्त करून तिसर्या क्रमांकावर आहे.
महेंद्र सिंह धोनीसाठी आजची लढत महत्त्वाची असेल. चेन्नईला मागील दोन सलग लढतीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्सने दमदार फलंदाजीच्या जोरावर चार सामन्यात विजय मिळवला आहे.
* प्लेइंग इलेवन :
> चेन्नई सुपर किंग्ज : ब्रँडन मॅक्कुलम, ड्वेन स्मिथ, सुरेश रैना, फॉफ डु प्लेसिस, ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी, पवन नेगी, मोहित शर्मा, आशीष नेहरा, ईश्वर पांडे.
> रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु :
विराट कोहली, मेडिसन, एबी डिव्हिलियर्स, मंदीप सिंह, डेव्हिड वेस, दिनेश कार्तिक, सरफराज खान, हर्षल पटेल, मिचेल स्टार्क, यजुवेंद्र चहल, इकबाल अब्दुल्लाह.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, चेन्नईविरुद्ध बंगळुरु लढतीमधील रोमांच ....