कोलकाता - कोलकाता नाईट रायडर्सने 35 धावांनी हैदराबादला हरवले. 20 षटकात हैदराबादने 9 खेळाडूंच्या नुकसानीवर 132 धावा केल्या होत्या. ईडन गार्डनवर आयपीएलच्या 38 व्या मॅचमध्ये कोलकाता नायटराइडर्सने हैदराबादला विजयासाठी 168 धावांचे लक्ष्य दिले होते.
हैदराबादने जिंकला टॉस
सनराइजर्स हैदराबादने कोलकाता नाइटरायडर्स विरूद्ध टॉस जिंकून पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. नाइटरायडर्सचे 9 मॅचेसमध्ये 9 गुण आहेत. तर सनराइजर्सचे आठ मॅचेचमध्ये आठ गुण आहेत. आयपीएल-8 च्या प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी दोन्ही सघांमध्ये चुरशीची लढत आहे.
टीम :
> कोलकाता नाइटरायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), रोबिन उथप्पा (विकेटकीपर), मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, यूसुफ पठान, आंद्रे रसेल, रॉयन टेन डोशेट, पीयूष चावला, उमेश यादव, जोहान बोथा, ब्रॅड हॉज
> सनरायजर्स हैदराबाद : डेविड वार्नर (कर्णधार), शिखर धवन, हनुमा विहारी, नमन ओझा, इयान मोर्गन, मोएसिस हेनरिक्स, बिपुल शर्मा, कर्ण शर्मा, प्रवीण कुमार, भुवनेश्वर कुमार, डेल स्टेन