आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE IPL 8, 39th Match: Mumbai Indians V Delhi Daredevils At Mumbai, May 5, 2015

IPL: मुंबई इंडियन्स टीमचा पाचवा विजय; दिल्ली डेअरडेव्हिल्स संघावर ५ गड्यांनी केली मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जबरदस्त फाॅर्मात असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने अाठव्या सत्राच्या अायपीएल क्रिकेट स्पर्धेत शानदार पाचव्या विजयाची नाेंद केली. मुंबई संघाने अापल्या घरच्या मैदानावर राेमहर्षक सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सचे पानिपत केले. मुंबई संघाने १९.३ षटकांमध्ये ५ गड्यांनी दिल्लीवर मात केली. यासह यजमान मुंबई संघाने यंदाच्या सत्रात पाचव्या विजयाची नाेंद केली. दुसरीकडे दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सहावा पराभव ठरला. पावसाच्या व्यत्ययानंतरही दमदार पुनरागमन करून मुंबईने शानदार विजय मिळवला.

अंबाती रायडू (४९) अाणि पाेलार्ड (२६) यांच्या अभेद्य ५३ धावांच्या भागीदारीच्या बळावर मुंबई संघाने १९.३ षटकांत सामना जिंकला.

युवराजच्या अर्धशतक खेळीमुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सला प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १५२ धावा काढता अाल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने ५ गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले.
धावांचा पाठलाग करणा-या मुंबईची निराशाजनक सुरुवात झाली.सलामीवीर सिमन्स शून्य अाणि हार्दिक पांड्या ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर राेहित शर्माने एकाकी झुंज देत संघाच्या विजयाचा पाया रचला. त्याने ४६ धावांची तुफानी खेळी केली.

तत्पूर्वी, मलिंगाच्या पहिल्याच चेंडूवर दिल्ली डेअरडेव्हिल्सचा मयंक अग्रवाल विकेटकीपरकडे झेल देऊन बाद झाला. यानंतर आलेल्या ड्युमिनी आणि श्रेयस अय्यरने ४० धावांची भागीदारी केली. १९ धावांवर अय्यर बाद झाल्यावर केदार जाधवने थोडा वेळ किल्ला लढवला.

युवराजचे अर्धशतक व्यर्थ
सर्वात महागड्या युवराजने मुंबईविरुद्ध झंझावाती फलंदाजी केली. त्याने धडाकेबाज ५७ धावांची खेळी केली. दिल्लीच्या युवराज सिंगने ४४ चेंडूंत सात चाैकार व दाेन षटकारांच्या अाधारे ही धावसंख्या अापल्या नाव केली. त्याने सहा सामन्यानंतर पुनरागमन करताना अर्धशतक ठाेकले. यापूर्वी त्याने १५ एप्रिल राेजी पंजाबविरुद्ध अर्धशतक ठाेकले हाेते.

हरभजन, मलिंगाचे २ बळी
मुंबई इंडियन्सकडून हरभजन सिंग अाणि मलिंगाने घरच्या मैदानावर धारदार गाेलंदाजी केली. या दाेघांनी दिल्लीविरुद्ध प्रत्येकी दाेन विकेट घेतल्या. यात हरभजनने चार षटकांमध्ये ११ धावा देत दाेन बळी घेतले. तसेच यात एका निर्धाव षटकाचा समावेश अाहे. त्याने केदार जाधव अाणि डुमिनीला बाद करून तंबूत पाठवले.

मुंबईची चाैथ्या स्थानी धडक
सलगच्या विजयाची माेहीम अबाधित ठेवत तळातल्या मुंबई संघाने गुणतालिकेत चाैथ्या स्थानावर धडक मारली. मुंबईने पाच विजयांसह १० गुणांसह अव्वल चारमध्ये स्थान मिळवले.मुंबईने बंगळुरू, दिल्ली, हैदराबादवर कुरघाेडी करून हे स्थान पटकावले.
पुढे पाहा, धावफलक...