आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE IPL 8, 42nd Match: Kolkata Knight Riders V Delhi Daredevils At Kolkata

IPL: पीयूषचा चौकार; नाइट रायडर्सचा विजयी षटकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंदाचा सर्वात महागडा खेळाडू युवराजला बाद केल्यानंतर पीयूष चावलाने असा जल्लोष केला.
काेलकाता - गाैतम गंभीरच्या नेतृत्वाखाली अाठव्या सत्राच्या अायपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी काेलकाता नाइट रायडर्सने दिल्ली जिंकली. यजमान संघाने १३ धावांनी विजय संपादन केला. काेलकाता संघाचा सत्रातील हा सहावा विजय ठरला. यासह काेलकाता संघाने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर धडक मारली.

पीयूष चावलाच्या (४/३२) धारदार गाेलंदाजीच्या बळावर काेलकाता संघाने सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना काेलकाता संघाने ७ बाद १७१ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात दिल्लीने ६ गडी गमावून १५८ धावांत गाशा गुंडाळला. दिल्लीकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. तिवारी (२५), डुमिनी (२५) व मॅथ्यूज (२२) झटपट बाद झाले.

पीयूष चावलाचे चार बळी
काेलकाता नाइट रायडर्सकडून पीयूष चावलाने शानदार चार बळी घेतले. त्याने चार षटकांमध्ये ३२ धावा देत या विकेट काढल्या. त्याने सलामीवीर मनाेज तिवारीसह डुमिनी, केदार जाधव अाणि युवराज सिंगला बाद केले. युवराज भाेपळा न फाेडता तंबूत परतला.