आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • LIVE IPL 8, 43rd Match: Chennai Super Kings V Mumbai Indians At Chennai, May 8, 2015

IPL : मुंबई इंडियन्सचा सुपर विजय, चेन्नई सुपरकिंग्जवर ६ गड्यांनी मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - राेहित शर्माच्या (१८) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने शुक्रवारी अाठव्या सत्राच्या अायपीएल क्रिकेट स्पर्धेत विजयाचा षटकार मारला. मुंबई संघाने स्पर्धेतील अापल्या ११ व्या सामन्यात धाेनीच्या चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव केला. मुंबईने १९.२ षटकांमध्ये ६ गड्यांनी विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत चाैथ्या स्थानावर धडक मारली. मुंबईचे अाता १२ गुण झाले अाहेत.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपरकिंग्जने ५ बाद १५८ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात अंबाती रायडू (३४) अाणि हार्दिक पांड्या (नाबाद २१) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने चार गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. रायडू अाणि पांड्या यांनी अभेद्य ३४ धावांची भागीदारी करून मुंबईला विजय मिळवून दिला. धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सला पार्थिव पटेल (४५) अाणि सिमन्स (३८) यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. या दाेघांनी पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. यात पटेलने ३२ चेंंडूंत ४५ धावा काढल्या. यात सहा चाैकारांचा समावेश अाहे. तसेच सिमन्सने ३१ चेंंडूंमध्ये तीन चाैकार अाणि दाेन षटकारांच्या अाधारे ३८ धावांची खेळी केली. त्यानंतर कर्णधार राेहित शर्माने १८ धावांचे याेगदान दिले.

नाणेफेक जिंकून धाेनीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर डॅवेन स्मिथ (२७) अाणि मॅक्लुमने (२३) दमदार सुरुवात केली. सलामीच्या या जाेडीने पहिल्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. मात्र, विनयकुमारने ही जाेडी फाेडली. त्याने मॅक्लुमला पांड्याकरवी झेलबाद केले. मॅक्लुमने ११ चेंडूंमध्ये २३ धावा काढल्या. यात तीन चाैकार अाणि एका षटकाराचा समावेश अाहे. सुरेश रैनाने १० व डुप्लेसिसने १७ धावांची खेळी करून तंबू गाठला.
त्यानंतर धाेनीने नाबाद ३९ धावा काढल्या. याशिवाय त्याने पवन नेगीसाेबत पाचव्या गड्यासाठी ५४ धावांची शानदार भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर चेन्नईने सन्मानजनक धावसंख्या उभी केली.

गाेलंदाजीत मुंबईकडून मॅक्लिनघन, सुचिथ, विनयकुमार अाणि हरभजनसिंग यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

नेगीचे महागडे षटक
पवन नेगीमुळे चेन्नई सुपरकिंग्जला अापल्या हातचा सामना गमावण्याची वेळ अाली. त्याने सामन्यातील १९ व्या षटकात एकूण २५ धावा दिल्या. या षटकांमध्ये हार्दिक पांड्याने तीन षटकार व एक धाव काढली. तसेच रायडूने एक षटकार ठाेकला. यासह या षटकांत एकूण २५ धावा निघाल्या. यासह मुंबईच्या विजयाचा मार्ग माेकळा झाला. पवन नेगीने चार षटकांत ३४ धावा दिल्या.

पांड्या-रायडूचा झंझावात
चेन्नईविरुद्ध सामन्यात अंबाती रायडु अाणि हार्दिक पांड्या ही जाेडी मुंबई इंडियन्सच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या दाेघांनी अभेद्य ३४ धावांची भागीदारी करून मुंबईचा विजय निश्चित केला. हार्दिक पांड्याने ८ चेंडूंत तीन षटकारांच्या अाधारे नाबाद २१ धावा काढल्या. यासह ताे सामन्यातील विजयाचा शिल्पकार ठरला. तसेच त्याला सामनावीर पुरस्काराने गाैरवण्यात अाले. रायडुने १९ चेंडूंत ३४ धावांची खेळी केली. यात तीन षटकार व एका चाैकाराचा समावेश अाहे. या दाेघांनीही संघाच्या विजयाचे माेठे अंतर कमी करण्यात महत्वाची खेळी केली. पवन नेगीसह अाशिष नेहरा अाणि रवींद्र जडेजाच्य गाेलंदाजीचा खरपुस समाचार घेत मुंबईने शानदार विजयाची नाेंद केली.

अाजचे सामने (प्रक्षेपण साेनी मॅक्सवर)
>कोलकाता नाइट रायडर्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब
दु. ४ वाजेपासून, स्थळ : कोलकाता
>दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. सनरायझर्स हैदराबाद
रात्री. ८ वाजेपासून, स्थळ : रायपूर
बातम्या आणखी आहेत...