आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • LIVE IPL 8, 45th Match: Delhi Daredevils V Sunrisers Hyderabad At Raipur, May 9, 2015

IPL :सनरायझर्स विजयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेनरिक्स
रायपूर - डेव्हिड वाॅर्नरच्या सनरायझर्स हैदराबाद संघाने शनिवारी अाठव्या सत्राच्या अायपीएल क्रिकेट स्पर्धेत शानदार विजय संपादन केला. यासह हैदराबादने प्ले अाॅफमधील अाशा कायम ठेवल्या अाहेत. करा वा मरा सामन्यात हैदराबादने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा ६ धावांनी पराभव केला.
हैदराबादने सहाव्या विजयासह गुणतालिकेत चाैथे स्थान गाठले. मुंबईची पाचव्या स्थानी घसरण झाली. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमाेर १६४ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात दिल्लीने ४ गडी गमावून १५७ धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीसाठी डिकाॅक ५०, केदारने ६३ व साैरभ तिवारीने केलेली नाबाद २६ धावांची खेळी व्यर्थ ठरली.

हेनरिक्सचे अर्धशतक
विजयासाठी उत्सुक असलेल्या हैदराबाद संघासाठी हेनरिक्सने शानदार अर्धशतक ठाेकले. त्याने तुफानी ७४ धावांची खेळी केली. त्याने दिल्लीच्या गाेलंदाजीला फाेडून काढत ४६ चेंडूंमध्ये एक चाैकार अाणि पाच षटकारांच्या अाधारे ही धावसंख्या उभी केली. माॅर्गन (२२), कर्णधार डेव्हिड वाॅर्नर १७ व बाेपाराने नाबाद १७ धावा काढल्या.
पुढे पाहा, धावफलक
बातम्या आणखी आहेत...