आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनरायझर्सचा सातवा विजय, किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- डेव्हिड वाॅर्नरच्या (८१) झंझावातासह हेनरिक्स (३/१६) अाणि बिपुल शर्माच्या (२/१३) धारदार गाेलंदाजीच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद संघाने साेमवारी शानदार विजयाची नाेंद केली. यजमान हैदराबाद टीमने घरच्या मैदानावर राेमहर्षक सामन्यात जाॅर्ज बेलीच्या किंग्ज इलेव्हन पंजाबवर ५ धावांनी मात केली. यासह हैदराबादच्या टीमने अाठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत सातव्या विजयाची नाेंद केली. तसेच हैदराबादने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर धडक मारली. दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबचा हा दहावा पराभव ठरला.

प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने पाच गड्यांच्या माेबदल्यात किंग्ज इलेव्हन पंजाबसमाेर विजयासाठी १८६ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात पंजाब संघाने १८० धावांपर्यंत मजल मारली. मात्र, या टीमला अवघ्या पाच धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला.
खडतर अाव्हानाचा पाठलाग करणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबला सलामीच्या मुरली विजय (२४) अाणि वाेहरा (२०) यांनी दमदार सुरुवात केली.या दाेघांनी संघाला ४२ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. मात्र, मुरली विजयला बाद करून बिपुल शर्माने संघाला महत्वाचा बळी मिळवून दिला. त्यापाठाेपाठ वृद्धिमान साहा (५) झटपट बाद झाला. ग्लेन मॅक्सवेल ११ धावांची खेळी करून तंबूत परतला. पंजाबच्या अाघाडीच्या फलंदाजांना फार काळ मैदानावर अाव्हान कायम ठेवता अाले नाही. हैदराबादच्या गाेलंदाजांसमाेर या फलंदाजांना गुडघे टेकले.
तत्पूर्वी यजमान सनरायझर्स हैदराबादने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा िनर्णय घेतला. हैदराबादने निर्धारित २० षटकांत ५ बाद १८५ धावा ठोकल्या. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने जबरदस्त फलंदाजी करताना ८१ धावा ठोकल्या.

डेव्हिड वॉर्नर ५०० च्या पुढे
आयपीएल-८ मध्ये ५०० धावांचा टप्पा ओलांडणारा डेव्हिड वॉर्नर पहिला फलंदाज ठरला आहे. आता तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. वॉर्नरच्या आता एकूण ५०४ धावा झाल्या आहेत. वॉर्नरच्या आधी राजस्थान रॉयल्सच्या अजिंक्य रहाणेकडे बरेच दिवस ऑरेंज कॅप होती. रहाणेने या स्पर्धेत ११ सामन्यांत ५१.२२ च्या सरासरीने ४६१ धावा काढल्या आहेत.
वॉर्नर-हेनरिक्सची अर्धशतकी भागीदारी
वॉर्नर व धवनने (२४) पहिल्या विकेटसाठी ५६ धावांची, तर वॉर्नर-हेनरिक्स (२८ धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली.

डेव्हिड मिलरचा झंझावात व्यर्थ
पंजाबकडून डेव्हिड मिलरचा नाबाद ८९ धावांचा झंझावात व्यर्थ ठरला. त्याने ४४ चेंडूंत ९ षटकारांच्या अाधारे ही धावसंख्या उभी केली.