आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबचा बंगळुरूवर २२ धावांनी \'रॉयल\' विजय; अक्षर पटेल सामनावीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली- पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने अाठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत दमदार पुनरागमन केले. जाॅर्ज बेलीच्या नेतृत्वाखाली पंजाबने गुरुवारी विराट काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. पंजाबच्या टीमने २२ धावांनी शानदार विजयाची नाेंद केली. किंग्ज इलेव्हन पंजाबचा तिसरा विजय, तर बंगळुरू टीमचा हा पाचवा पराभव ठरला.

प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने दहा षटकांत बाद १०६ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूला निर्धारित दहा षटकांमध्ये बाद ८४ धावांपर्यंत मजल मारता अाली. बंगळुरूसाठी क्रिस गेल १७, विराट काेहली १९ अाणि मनदीपने सर्वाधिक २० धावांची खेळी केली. मात्र, त्यांना संघाचा पराभव टाळता अाला नाही.

धावांचा पाठलाग करणाऱ्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून स्फाेटक फलंदाज क्रिस गेल अाणि विराट काेहलीने दमदार सुरुवात केली. या दाेघांनी पहिल्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. मात्र, अनुरित सिंगने ही जाेडी फाेडली. त्याने काेहलीला (१९) बाद केले. अक्षर चहलने प्रत्येकी दोन बळी घेतले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून विराट काेहलीच्या बंगळुरू संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या वेळी मैदानावर फलंदाजीसाठी उतरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने शानदार फलंदाजी केली. सलामीवीर वृद्धिमान साहा अाणि मनन वोहराने संघाला दमदार सुरुवात करून दिली. या दाेघांनी ३४ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. साहाने १२ चेंडूंत ३२ धावा काढल्या. त्याला डेव्हिड विसने बाद केले. तसेच मनन वाेहराने ११ धावांचे याेगदान दिले. हर्षल पटेलने संघाला महत्त्वाचा बळी मिळवून दिला. त्याने ग्लेन मॅक्सवेलला बाद केले. मॅक्सवेलने १० धावांची खेळी करून तंबू गाठला. डेव्हिड मिलरही फारशी छाप पाडू शकला नाही. त्याने षटकारांच्या अाधारे १४ धावा काढल्या.

अक्षरची अष्टपैलू खेळी
किंग्जइलेव्हन पंजाबकडून युवा गाेलंदाज अक्षर पटेलने अष्टपैलू खेळी केली. त्याने फलंदाजी करताना १५ चेंडूंत एका षटकाराच्या अाधारे २० धावा काढल्या. गाेलंदाजीत त्याने दाेन विकेट घेतल्या. या वेळी अनुिरतनेही दोन बळी घेऊन संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले.

पावसाचा व्यत्यय
किंग्जइलेव्हन पंजाब अाणि राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यात पावसाचा व्यत्यय अाला. त्यामुळे रात्री उशिरा १०.३० वाजता सामन्याला सुरुवात झाली. यामुळे सामना प्रत्येकी दहा षटकांचा ठेवण्यात अाला.
बातम्या आणखी आहेत...