आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Live Ipl 8 51st Match Mumbai Indians V Kolkata Knight Riders At Mumbai May

मुंबईचा राेमहर्षक विजय; कोलकाता नाइट रायडर्सवर पाच धावांनी केली मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अाठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेतील करा वा मराच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने शानदार विजयाची नाेंद केली. यजमान मुंबई संघाने अापल्या घरच्या मैदानावर गतविजेत्या काेलकाता नाइट रायडर्सला धावांनी पराभूत केले. यासह मुंबईच्या टीमने अापल्या प्ले अाॅफमधील प्रवेशच्या अाशा कायम ठेवल्या. मुंबई इंडियन्सने सातव्या विजयासह गुणतालिकेत चाैथ्या स्थानावर धडक मारली. दुसरीकडे गाैतम गंभीरच्या काेलकाता संघाला पाचव्यांदा पराभवाला सामाेरे जावे लागले.

प्रथम फलंदाजी करताना राेहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने बाद १७१ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात गाैतम गंभीरच्या काेलकाता नाइट रायडर्सला बाद १६६ धावांपर्यंत मजल मारता अाली.
धावांचा पाठलाग करणाऱ्या काेलकाता संघाकडून युसूफ पठाणने (५२) एकाकी झुंज दिली. मात्र, त्याला संघाचा पराभव टाळता अाला नाही. गाैतम गंभीर (३८), शाकिब (२३) देखील अपयशी ठरले.
मुंबई इंडियन्सच्या आघाडीच्या चार फलंदाजांना फक्त ७९ धावांमध्ये गुंडाळले होते. यात सलामीच्या सिमन्ससह (१४), पार्थिव पटेल (२१) अाणि अंबाती रायडू (३) झटपट बाद झाले.
युसूफची झंुज ठरली व्यर्थ
विजयासाठीयुसूफने एकाकी झुंज दिली. त्याने मुंबईच्या गाेलंदाजीला चाेख प्रत्युत्तर देत ५२ धावा काढल्या. मात्र, त्याला साथ देणाऱ्या फलंदाजांना फार काळ अाव्हान कायम ठेवता अाले नाही.
सुनील गावस्कर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची उपस्थिती आज वानखेडेवर होती. तसेच पीकू चित्रपटाच्या प्रमाेशनच्या निमित्ताने बिग बी अमिताभ बच्चनसह सिनेअभिनेत्री दीपिका पदुकोन उपस्थित हाेती.
हार्दिक पांड्या-पाेलार्डची ९२ धावांची भागीदारी
मुंबईचीहाेत असलेली पडझड हार्दिक पांड्या पोलार्डने थांबवली. या दाेघांनी मुंबई इंडियन्सचा डाव सावरला. या दाेघांनी काेलकात्याच्या गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेताना पाचव्या विकेटसाठी ९२ धावांची अभेद्य भागीदारी केली. यासह मुंबई इंडियन्सचा डाव २० षटकांत १७१ धावांपर्यंत नेऊन ठेवला. पांड्याने पोलार्डबरोबर ५२ चेंडूंमध्ये ९२ धावांची भागीदारी करताना ३१ चेंडूंमध्ये चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने तब्बल ६१ धावा ठोकल्या.
काेलकाताविरुद्ध फटका मारण्याच्या प्रयत्नात सामनावीर हार्दिक पांड्या.
संघ मॅच वि. परा. अनि. गुण रनरेट
चेन्नई१३ १६ + ०.६४६
कोलकाता १३ १५ + ०.३१५
हैदराबाद १२ १४ - ०.०१७
मुंबई १३ १४ - ०.३५९
राजस्थान १३ १४ + ०.०२७
बंगळुरू १२ १३ + १.०३६
दिल्ली १३ १० - ०.०४९
पंजाब १३ १० ०६ - १.४२५

काेलकातानाइट रायर्ड्स धावा चेंडू
उथप्पाझे. मलिंगा गाे. हरभजन २५ २०
गाैतम गंभीर त्रि.गाे. सुुचिथ ३८ २९
मनीष पांडे धावबाद (सिमन्स) ०१ ०१
युसूफ झे. पटेल गाे. पाेलार्ड ५२ ३७
शाकीब झे. पांड्या गाे. विनयकुमार २३ १५
रसेल झे. पटेल गाे. मलिंगा ०२ ०४
सूर्यकुमार झे. रायडू गाे. मॅक्लिनघन ११ ०५

पीयूष चावला नाबाद ०१ ०७
उमेश यादव नाबाद ०५ ०२

अवांतर:०८. एकूण:२० षटकांत बाद १६६ धावा. गडीबाद होण्याचा क्रम :१-४५, २-४६, ३-८८, ४-११८, ५-१२८, ६-१४४, ७-१६०. गोलंदाजी:मलिंगा ४-०-३१-१, मॅक्लिनघन ४-०-३१-१, विनयकुमार ४-०-३३-१, हरभजन सिंग ४-०-३१-१, सुचिथ २-०-२३-१, हार्दिक पांड्या १-०-१०-०, पाेलार्ड १-०-६-१.