आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DDvsRR: पुन्हा जिंकता जिंकता हारली दिल्ली, शेवटच्या चेंडूत चौकार ठोकत राजस्थानचा विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीः आयपीएल - 8 मधील सहाव्या सामन्यात दिल्ली डेयरडेव्हिल्सने दिलेल्या 184 धावांच्या आव्हानाला सामोरे जात राजस्थान रॉयल्सने 5 गडी बाद 186 धावा करून विजय मिळवला.
दिल्ली डेयरडेविल्सच्या 184 धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरूवात एवढी चांगली झाली नाही. राजस्थान रॉयल्सला पहिला झटका संजू सॅमसन (11) धावा केल्या. एंजिलो मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर युवराजने सॅमसनचा झेल धरला. यानंतर मैदानात आलेला स्टीवन सुध्दा 10 धावाकाढून अमित मिश्राच्या गोलंदाजीवर पवेलियनमध्ये परतला. स्टीवनचा झेल मयंक अग्रवालने धरला
कर्णधार डुमिनीची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानसमोर 185 धावांचे आव्हान
दिल्ली डेयरडेव्हील्समधील तरूण खेळाडू मयंक अग्रवाल (37), श्रेयस अय्यर (40) आणि कर्णधार जेपी डुमिनीच्या 44 धावांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे डेयरडेव्हिल्सने 20 षटकांमध्ये 184 धावा बनवल्या. आयपीएल-8 मधील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला युवराज सिंगने राजस्थान विरूध्द काही चांगले फटकार मारले, मात्र तो जास्तवेळ मैदानावर टिकू शकला नाही. युवराज 17 चेंडूत 2 षटकार ठोकत 27 धावा काढून बाद झाला.
मयंकनंतर श्रेयसने केली फटकेबाजी, 3 चौकार आणि 3 षटकार लगावले
कर्णधार जेपी डुमिनी चांगली सुरूवात करून देणारा मयंक बाद झाल्यानंतर मैदानात उतरले. मनात एका वेगळ्या खेळीचा विचार करत मैदानात उतरलेले डुमिनी स्वतःच्या अपेक्षेस पात्र ठरले. डूमिनी आणि श्रेयस ऐय्यर या दोघांनी मिळून धावसंख्या वाढवली. मयंकनंतर श्रेयस ऐय्यरने खेळ सावरला आणि 30 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकार ठोकले. श्रेयससुध्दा 40 धावांवर बाद झाला. जेपी डुमिनी आणि श्रेयस ऐय्यर यांनी मिळून 6.2 षटकांमध्ये 48 धावा काढल्या. यामध्ये श्रेयसने 33 आणि डुमिनीने 12 धावा केल्या.
युवराजने 17 चंडूत काढल्या 27 धावा
दिल्लीची धावसंख्या 93 असतांना श्रेयस बाद झाला. टीम साऊदीने क्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर त्याचा झेल धरला. यानंतर मैदानावर दिग्गज फलंदाज युवराज सिंह उतरला. युवराजने मैदानावर येताच काही उत्कृष्ट फटके मारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र क्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर करूण नायरने युवराजचा झेल धरला. युवराजने 17 चेंडूत दोन षटकारच्या साह्याने 27 धावा बनवल्या. युवराज बाद झाल्यानंतर एंजिलो मैथ्यूजने 14 चेंडूत 27 धावा करत संघाला 184 धावांवर पोहोचवले. कर्णधार जेपी डुमिनीने 38 चेंडूत 3 षटकार ठोकत नाबाद 44 धावा केल्या.
कोण कोण आहे सामन्यात:
दिल्ली डेयरडेविल्स : जेपी डुमिनी (कर्णधार), मनोज तिवारी, केदार जाधव, मयंक अग्रवाल, इमरान ताहिर, नाथन कोल्टर, एंजेलो मैथ्यूज, युवराज सिंह, अमित मिश्रा, जयदेव उनादकत, श्रेयष अय्यर

राजस्थान रॉयल्स : स्टुअर्ट बिन्नी, जेम्स फल्कनर, अजिंक्य रहाणे, संजू सैमसन, स्टीव स्मिथ, टिम साउदी, धवल कुलकर्णी, करुण नायर, दीपक हुड्डा, प्रवीण तांबे, क्रिस मोरिस