आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Live Ipl8 22nd Match Rajasthan Royals V Royal Challengers Bangalore At Ahmedabad

IPL : बेगळुरुने मिळवला यंदाच्या आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघाने यंदाच्या आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला आहे. राजस्थानने ठेवलेले 131 धावांचे आव्हान बेंगळुरुने 9 विकेट आणि 23 चेंडू शिल्लक ठेवत पूर्ण केले.
रॉयल चॅलेंजर्सने नाणेफेक जिंकून आधी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. लागोपाठ पाच सामने जिंकल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबने त्यांना सुपर ओव्हरमध्ये बाद केले होते. त्यानंतर आज फलंदाजीला मैदानावर उतरल्यानंतर पाचव्या षटकात राहणेच्या रुपात त्यांचा पहिला गेला. त्यानंतर एकापाठोपाठ एक त्यांच्या विकेट पडत होत्या. एकाही फलंदाजाला मैदानावर टिकाव धरता आला नाही. स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 31 धावा केल्या.
हे आव्हान पेलण्यासाठी मैदानात बेंगळुरूकडून कोहली आणि गेल हे मैदानात उतरले. त्यांनी अत्यंत चांगली सुरुवात केली. गेलला मोठी धावसंख्या करता आली नाही. तो २० धावांवर बाद झाला. पण सुरुवात चांगली झाली होती. त्याच्याबरोबर आलेल्या कोहलीने अर्धशतक पूर्ण करत नाबाद 62 तर डिव्हिलियर्सने नाबाद 47 धावा केल्या.
संघ असे
राजस्थान रॉयल्स:
शेन वॉटसन(कर्णधार),अभिषेक नायर, अजिंक्य रहाणे, अंकित शर्मा, बेन कटींग, दीपक हुडा, धवल कुलकर्णी, दिशान्त याग्निक, जेम्स फॉल्कनर, केन रिचर्डसन, करुण नायर, प्रवीण तांबे, राहुल तेवटिया, रजत भाटिया, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, स्टुअर्ट बिन्नी, ट‍िम साऊदी, विक्रमजित मलिक, ख्रिस मॉरिस, जुआन थेरोन, बरिंदरसिंह सरन, दिनेश साळुंके, सागर त्रिवेदी, प्रदीप साहू.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु
विराट कोहली(कर्णधार) एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, दिनेश कार्तिक एस.बद्रीनाथ, डेरेन सॅमी, मिशेल स्टार्क, निक मेडिनसन, वरुण आरोन, यजुवेंद्र चहल, रिली रोसोयू, विजय झोल, योगेश ताकवले, अबू डिंडा, संदीप वॉरियर, मानविंदर बिस्ला, इक्बाल अब्दुल्ला, सीन एबोट, अॅडम मिल्ने, डेव्हिड व्हिसे, जलज सक्सेना, सर्फराज खान, शिशिर बावने.