आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिखर धवनचे शतक, भारताचा दुसरा विजय; मालिकेत 2-0 ने घेतली आघाडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरारे- सामनावीर शिखर धवनचे शतक (116) आणि जयदेव उनाडकतच्या (4/41) शानदार गोलंदाजीच्या बळावर भारताने मालिकेतील दुसर्‍या वनडेत शुक्रवारी झिम्बाब्वेवर 58 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करणार्‍या भारताने 8 बाद 294 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमानांना 9 गड्यांच्या मोबदल्यात 236 धावांपर्यंत मजल मारता आली. मालिकेतील तिसरा वनडे 28 जुलैला होणार आहे.

धावांचा पाठलाग करणार्‍या झिम्बाब्वेने चांगली सुरुवात केली. सलामीवीर सिंबादा (55) व सिकंदर रजाने (20) या दोघांनी पंिहल्या गड्यासाठी 45 धावांची भागीदारी केली. मात्र, उनाडकतने ही जोडी फोडली. त्याने सिकंरदला शिखर धवनकरवी झेलबाद केले. त्यानंतर मसकदजाने सिंबादासोबत दुसर्‍या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. त्यानंतर झिम्बाव्वेचा संघ ढेपाळला.मात्र, तळातल्या चिगुम्बुरा व उत्सयाने संघाचा डाव सावरला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. यामध्ये चिगुम्बुराने 46 आणि उत्सयाने नाबाद 52 धावांची खेळी केली. भारताकडूून जयदेव उनाडकतने चार, अमित मिश्राने दोन, मो. शमी आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक गडी बाद केला. उनाडकतने शेवटच्या षटकात सलग दोन चेंडूंवर दोन गडी बाद केले.

तत्पूर्वी फलंदाजीसाठी आलेल्या भारताची निराशाजनक सुरुवात झाली. मात्र, शिखर धवन व दिनेश कार्तिकने संघाचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. धवनने 127 चेंडूंत 11 चौकार व दोन षटकारांसह 116 धावा काढल्या. कार्तिकने त्याला चांगली साथ दिली. त्याने 74 चेंडूंत सहा चौकारांच्या साहाय्याने 69 धावांची खेळी केली. या वेळी विनयकुमारने 12 चेंडूंत दोन चौकार व दोन षटकार ठोकून संघाला नाबाद 27 धावांचे योगदान दिले. सलामीवीर रोहित शर्मा 1, कर्णधार विराट कोहली 14, अंबाती रायडू 5, सुरेश रैना 4, रवींद्र जडेजा 15 आणि अमित मिश्रा 9 धावांवर बाद झाला.

अधिक वाचण्‍यासाठी तसेच सामन्‍यातील फोटो पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...