आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Live Match Of Rajashtan Royals Vs Kings Xl Punjab At Mohali

IPL: राजस्‍थानने पंजाबवर केली मात, रहाणे-सॅमसन चमकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली- सलामीवीर अजिंक्‍य रहाणे (नाबाद 59 धावा), संजू सॅमसन (नाबाद 47 धावा) आणि शेन वॉटसन (31 धावा) यांच्‍या फटकेबाजीच्‍या जोरावर राजस्‍थान रॉयल्‍सने किंग्‍ज इलेव्‍हन पंजाबवर 8 गडयांनी मात केली. विजयासाठी आवश्‍यक असलेले 146 धावांचे आव्‍हान राजस्‍थानने 6 चेंडू राखून पूर्ण केले.


राजस्‍थानची सुरूवातही धक्‍कादायक ठरली. मागील सामन्‍यातील अर्धशतकवीर कर्णधार राहुल द्रविड 4 धावांवर बाद झाला. बिपुल शर्माने त्‍याचा त्रिफळा उडवला. त्‍यानंतर फलंदाजीस आलेल्‍या वॉटसनने चांगलीच फटकेबाजी केली. त्‍याने 3 चौकार आणि 1 षटकाराच्‍या मदतीने 31 धावा केल्‍या. राजस्‍थानला या सत्रात सापडलेला हिरा संजू सॅमसनची फलंदाजी दिवसेंदिवस बहरतच चालली आहे. आजच्‍या सामन्‍यातही त्‍याने अवघ्‍या 33 चेंडूत नाबाद 47 धावा केल्‍या. यामध्‍ये त्‍याने 5 चौकार आणि 1 षटकार मारला. आजच्‍या सामन्‍याचा खरा हिरो ठरला तो अजिंक्‍य रहाणे. त्‍याने पंजाबच्‍या गोलंदाजांचे लक्‍तरेच मांडली. रहाणेने 3 चौकार आणि 3 षटकारांच्‍या मदतीने 59 धावा केल्‍या. पंजाबकडून बिपुल शर्मा, पियुष चावला यांनी 1-1 गडी टिपला. सामन्‍यातील अधिक माहितीसाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...