आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Live Match Of Rajshthan Royal Vs Kings Eleven Punjab In Ipl

राजस्थान रॉयल्सचा तिसरा विजय; फुल्कनेर सामनावीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - अजिंक्य रहाणे (34) व एस. सॅमसन (27) यांच्या अभेद्य 47 धावांच्या भागीदारीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल-6 मध्ये रविवारी रात्री किंग्ज इलेव्हन पंजाबवर 6 गड्यांनी विजय मिळवला. या संघाचा हा तिसरा विजय ठरला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने सर्वबाद 124 धावा काढल्या होत्या. राजस्थानने 19.2 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. राजस्थानचा फुल्कनेर सामनावीर ठरला.

धावांचा पाठलाग करणा-या राजस्थानकडून अजिंक्य रहाणेने सलामीवीर वॉटसनसोबत पहिल्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. वॉटसनने 19 चेंडूंत सात चौकारांसह 32 धावा काढल्या. हॉजने 15 धावांचे योगदान दिले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीसाठी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या राजस्थान रॉयल्सला एस. श्रीसंतने दमदार सुरुवात करून दिली. त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सलामीवीर अ‍ॅडम गिलख्रिस्ट व मनदीप सिंगला स्वस्तात बाद केले. गिलख्रिस्ट सामन्यात भोपळा न फोडताच पॅव्हेलियनमध्ये परतला, तर मनदीपने अवघ्या दोन धावा काढून तंबू गाठला.

हसी-मेहमूदचा संघर्ष
पंजाबची दुसरी विकेट पडल्यानंतर डेव्हिड हसी फलंदाजीसाठी आला. त्याने एका टोकाने चांगली फलंदाजी केली. मात्र, दुस-या टोकाने पंजाबच्या विकेट पडत गेल्या. हसीने 31 चेंडूंत चार चौकार व एक षटकार ठोकून 41 धावांचे योगदान दिले. त्याला त्रिवेदीने झेलबाद केले. हसीशिवाय ऑलराउंडर मेहमूदने राजस्थानच्या गोलंदाजांचा धाडसाने सामना केला. त्याने 20 चेंडूंत तीन चौकारांसह 23 धावा काढल्या. त्याला कुपरने बाद केले.

बीसीसीआयची ‘त्या’ प्रकरणी श्रीसंतला ताकीद
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एस. श्रीसंतला ‘चापट’ मारहाणप्रकरणी ताकीद दिली. त्याने ट्विटरवर हरभजनसोबत झालेल्या वादावर दोन दिवसांपूर्वी ट्विट केले होते. या वेळी त्याने हरभजन पाठीत सुरा खुपसणारा असल्याचेही म्हटले होते. हा वाद पुन्हा चर्चेत आणल्यास कारणे दाखवा नोटीस पाठवू, असा इशारा बीसीसीआयने दिला.