आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Live Match Score In Ipl Of Hydrabad Sunrisers Vs Royal Challengers Banglore

IPL: कोहलीच्‍या धुवांधार फलंदाजीमुळे बंगळुरूचा हैदराबादवर \'रॉयल\' विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- हैदराबाद सनरायजर्सने दिलेले 162 धावांचे आव्‍हान कर्णधार विराट कोहलीच्‍या नाबाद तुफानी 93 धावांमुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने 14 चेंडू राखून पूर्ण केले. कोहलीने आपल्‍या खेळीत तब्‍बल 11 चौकार 4 षटकारांची आतषबाजी करीत संघाला सहज विजय मिळवून दिला. मयांक अग्रवाल, ख्रिस गेल बाद झाल्‍यानंतर एबी डिव्हिलयर्सची मदत घेत त्‍याने संघाला शतकापर्यंत मजल मारून दिली. डिव्हिलयर्स बाद झाल्‍यानंतरही त्‍याने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला आणि शेवटच्‍या 16 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकारांची बरसात केली.

बंगळुरूकडून मयांक अग्रवाल 29, ख्रिस गेल 13, एबी डिव्हिलयर्स 15 आणि हेन्रीक्‍स नाबाद 7 यांनी धावा काढल्‍या. तर हैदराबादकडून ईशांत शर्मा, परेरा आणि कॅमरून व्‍हाईट यांनी प्रत्‍येकी 1-1 गडी टिपला.

हैदराबादच्‍या डावाविषयी जाणून घेण्‍यासाठी क्‍लीक करा पुढच्‍या स्‍लाईडला...